मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे', भाजप महिला पदाधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट

'शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे', भाजप महिला पदाधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 24, 2022 08:47 AM IST

शिवसेनेचे जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात पोस्टरबाजी
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात पोस्टरबाजी (फोटो - एएनआय)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर आता राज्यात महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. त्यातच शिवसेनेचे (Shivsena) जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मी मुख्यमंत्रीपदासह शिवसेनेच्या पक्ष प्रमुख पदाचाही राजीनामा द्यायला तयार आहे, तुम्ही समोर येऊन सांगा असं म्हटलं होतं. त्यातच भाजप पदाधिकाऱ्यांकडून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भाजप मुंबई महिला मोर्चाच्या शीतल गंभीर देसाई यांनी यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना प्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. या पोस्टवर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कमेंट्स दिल्या आहेत. यावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका होतेय. शीतल गंभीर देसाई या माहिमच्या नगरसेविका आहेत. त्या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.

शीतल गंभीर देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या ग्राफिक्समध्ये शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन केलं आहे. शीतल गंभीर यांच्या या पोस्टवरून वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

<p>शीतल गंभीर देसाई यांची फेसबुक पोस्ट</p>
शीतल गंभीर देसाई यांची फेसबुक पोस्ट

गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदेसोबत असलेल्या आमदारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत 49 आमदार होते. त्यापैकी 42 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते. तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 13 आमदारांनी हजेरी लावल्याचं शिवसेनेने म्हटलं होतं. यातील काही आमदार हे वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, तर आदित्य ठाकरे हे मातोश्रीवरून उपस्थित होते. संजय राऊत यांनी शिंदेंच्या गटातील 21 आमदार संपर्कात असल्याचंही सांगितलं होतं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या