मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुवाहाटीत घुमला ‘आव्वाज..कुणाचा’, एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन,पाहा VIDEO
एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन
एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

गुवाहाटीत घुमला ‘आव्वाज..कुणाचा’, एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन,पाहा VIDEO

23 June 2022, 17:22 ISTShrikant Ashok Londhe

शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी ४२ आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे.

मुंबई -शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी ४२ आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. शिंदे ५० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देतील,असे मानले जात आहे. त्यावेळी शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचं दाखवून दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे३७हून अधिक शिवसेनेचेआमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहे. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार,आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या५०वर पोहोचणार आहे.संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल.नव्या सरकारचा सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे,शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.