Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलीस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलीस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार

Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलीस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार

Feb 01, 2024 10:21 AM IST

Maharashtra Police Bharti 2024 : पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तब्बल १७,४७१ जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 : राज्यातील रखडलेल्या पोलिस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल १७,४७१ जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने पोलिस दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधि आहे. त्यामुळे आता तयारीला लागावे लागणार आहे.

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट; मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

राज्य सरकारने १०० टक्के पोलिस भरती करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा मार्ग हा मोकळा झळ आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त ५० करता येत होती. असे असले तरी सरकारने पोलीस खात्यात १०० टक्के पदभरतीला मंजूरी दिली आहे. या मेगा भरतीत पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण १७४७१ पदांची भरती केली जाणार आहे.

राज्यात सध्या पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे याचा ताण हा पोलिस यंत्रणेवर येत होता. अनेक प्रकरणे यामुळे प्रलंबित राहत होती. तसेच कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाला नवा आकृतीबंध तयार करण्यास सांगितले होते. राज्यातील रिक्त जागांचा आढावा घेऊन आणि मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे.

LPG Price hike : बजेटच्या दिवशीच धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या, असे आहेत नवे दर

या पूर्वी गृह विभागाने २३ हजार पोलिसांची भरती केली होती. तरीदेखील पोलिस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होणार आहे.

राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात. एक हजारापर्यंत पोलिसांचे प्रमोशन होते आणि काहीजण स्वेच्छानिवृत्ती घेतात तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात.

या बाबत राज्य शासनाने जीआर काढला आहे. सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के १७४७१ पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत. या आशयाचा नवीन GR गृह विभागाद्वारे काढला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर