मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Building collapsed: ठाण्यात इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू, शोधकार्य सुरू

Thane Building collapsed: ठाण्यात इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू, शोधकार्य सुरू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 27, 2023 11:12 AM IST

Bhiwandi two storey Building collapsed: ठाण्याच्या भिवंडी परिसरातील दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या ठिकाणी अग्निशमनदलाचे शोधकार्य सुरू आहे.

Bhiwandi Building collapsed
Bhiwandi Building collapsed

Thane Building collapsed: ठाण्याच्या भिवंडी येथे खाडीपार भागात शुक्रवारी (27 जानेवारी २०२३) पहाटे दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत शोधकार्याला सुरुवात केली. ही इमारत ३० ते ३५ वर्ष जुनी असल्याचे बोलले जात आहे. या इमारातीच्या तळमजल्यावर एकूण ८ दुकाने होती. ही सर्व दुकाने ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहे. या घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ठाणेतील भिवंडीतील खाडीपार येथे आज पहाटे ३.५० मिनिटांनी एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर ताबडतोब आपत्ती व्यवस्थापन पथक आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान दोन अग्निशमन वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या तळमल्यावरील दुकानात राहणाऱ्या एका तरुणाचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला."

सावंत पुढे म्हणाला की, “भिवंडी अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी शोधमोहीम राबवून एका तरूणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर, दुसऱ्याची घटनास्थळावरून सुखरूप सुटका केली आहे. माजिद अन्सारी (वय, २५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून अश्रफ नागोरी (वय, २२) याला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.”

IPL_Entry_Point