Maharashtra Oath Ceremony: शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा, गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे ठाम? उदय सामंत म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Oath Ceremony: शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा, गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे ठाम? उदय सामंत म्हणाले...

Maharashtra Oath Ceremony: शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा, गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे ठाम? उदय सामंत म्हणाले...

Dec 05, 2024 03:22 PM IST

Eknath Shinde: महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार असून गृहमंत्रीपदावरून शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजत आहे.

 शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा
शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा

Uday Samant On Eknath Shinde: मुंबईच्या आझाद मैदानात आज (०५ नोव्हेंबर २०२४) महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. याआधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता कमी आहे. बुधवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिल्याच्या बातम्या येत होत्या.मात्र, आज त्यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांनी यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. हा सगळा पेच गृहमंत्रीपदावरुन फसल्याच बोलले जात आहे.

सर्व मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काय करायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे लवकरच घेतील. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले नाहीत तर आम्हीही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय सर्व आमदारांनी घेतला आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या नव्या सरकारबाबतचा सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शपथेबाबत विचारले असता त्यांनी काय घाई आहे, असे सांगितले. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत एकनाथ शिंदे यांनी होकार दिल्याची माहिती मिळाली. यानंतर तासभराने उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही, याचा निर्णय लवकरच सांगणार असल्याचे म्हटले.

शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदे नसतील तर कोणीच नाही, हे आम्ही स्पष्ट केले आहे. म्हणजेच शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर कोणताही नेता मंत्री होणार नाही. विशेष म्हणजे शपथविधीसाठी देण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या शपथेचा उल्लेख आहे. अशा तऱ्हेने एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही, या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.

विधानसभेत महायुतीला घवघवीत यश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाला १० जागेवर विजय मिळवता आला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर