काही कारणास्तव शपथविधी सोहळा बघायला जमलं नसेल तर ‘हा’ व्हिडिओ पाहा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काही कारणास्तव शपथविधी सोहळा बघायला जमलं नसेल तर ‘हा’ व्हिडिओ पाहा

काही कारणास्तव शपथविधी सोहळा बघायला जमलं नसेल तर ‘हा’ व्हिडिओ पाहा

Dec 05, 2024 07:25 PM IST

Maharashtra Government Oath Ceremony Video: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर, शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारचा शपधविधी सोहळा
महाराष्ट्र सरकारचा शपधविधी सोहळा (Deepak Salvi)

Maharashtra Government Oath Ceremony: भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदानात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे हे गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री होते, तर फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या निकालात महायुती आघाडीने चमकदार कामगिरी करत २३० जागा जिंकल्या. १३२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Live Updates

 

  • शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या दोघांनाही महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.

 

  • राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.

 

  • देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथविधीसोहळ्यासाठी व्यासपीठावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदीदेखील या सोहळ्याला उपस्थित आहेत.

 

  • महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा कोणताही नेता उपस्थित राहणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अनुपस्थित राहणार आहेत.

 

  • शपथविधी सोहळ्याला हजारो लोक उपस्थित होते. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, रणवीर सिंग, सलमान खान आणि इतर अनेक नामवंत कलाकारही पोहोचले आहेत.

 

  • देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व दिग्गज नेते व्यासपीठावर पोहोचले आहेत. एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.

 

  • महाराष्ट्राच्या शपथविधी सोहळ्याला मध्य प्रदेश, बिहारसह सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही दाखल झाले आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड कलाकार शाहरुख खान, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह इतर नामवंत सेलिब्रिटीही या सोहळ्याला हजेरी लावत आहेत.

 

  • गायक कैलाश खेर सध्या आझाद मैदानात शपथविधी सोहळ्यासाठी परफॉर्म करत आहेत. लवकरच शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदींसह सर्व दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर