मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Nashik: टोलनाक्यावर राडा; दोन महिला भिडल्या! पाहा व्हिडिओ

Nashik: टोलनाक्यावर राडा; दोन महिला भिडल्या! पाहा व्हिडिओ

Sep 15, 2022 06:48 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
Sep 15, 2022 06:48 PM IST
  • Pimpalgoan Toll Plaza : टोलनाक्यावर होणारे वाद नवीन नाहीत. मात्र, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोल नाका दोन महिलांच्या हाणामारीमुळं सध्या चर्चेत आहे. एक कारचालक महिला आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघींमध्ये थेट हाणामारी सुरू झाली. दोन्ही महिला एकमेकांना भिडल्या. एकमेकींचे केस पकडून शिवीगाळ सुरू झाली. बघ्यांची गर्दी जमल्यानंतर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, दोघीही एकमेकींना सोडायला तयार नव्हत्या. शेवटी दोघा तिघांनी मिळून या महिलांना बाजूला केले. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp