मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 8 July 2022 Live Updates Marathi Breaking News

Uddhav Thackeray

Marathi News 8 July 2022 Live: उद्धव ठाकरे काय बोलणार? दोन वाजता पत्रकार परिषद

Daily News Update

Fri, 08 Jul 202207:04 AM IST

Lalu Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची कन्या मिसा भारती यांनी दिली आहे.

<p>Lalu Yadav</p>
Lalu Yadav

Fri, 08 Jul 202206:42 AM IST

Sanjay Raut attacks BJP: संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

दिल्लीतून महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या प्रयत्नांना यश मिळणार नाही - संजय राऊत

Fri, 08 Jul 202206:39 AM IST

Sanjay Raut: संजय राऊत यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद

नाशिक हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येईल. नाशिकमधील सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. राज्यात कुठं काय घडतंय, याचाशी नाशिकचा संबंध नाही. इथं शिवसेनाच येईल. - संजय राऊत

Fri, 08 Jul 202206:42 AM IST

Sachin Sawant: राज्य सरकारच्या स्थैर्याबाबत भाजप साशंक; काँग्रेसचा दावा

नवीन सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ११ तारखेनंतर होणार आहे. सरकारच्या स्थिरतेबाबत भाजपच्या गोटात शंका दिसत आहे. भाजपच्या सत्ता लालसेमुळं राज्यात आलेली अस्थिरता, प्रलंबित प्रश्न व नैसर्गिक सावट पाहता मंत्रिमंडळ नसणं हे दुर्दैवी आहे. काही अघटीत घडले तर हे सत्तालोभी जबाबदार असतील, अशी संतप्त भावना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Fri, 08 Jul 202206:29 AM IST

Uddhav Thackeray Press Conference: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी २ वाजता 'मातोश्री' निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार. शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Fri, 08 Jul 202205:57 AM IST

IMD Alert for Mumbai: हवामान विभागाचा मुंबईला रेड अॅलर्ट

हवामान विभागानं मुंबईला २४ तासांसाठी रेड अॅलर्ट दिला आहे. आज दुपारी एक वाजल्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईकरांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचं प्लानिंग करावं, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

Fri, 08 Jul 202205:55 AM IST

Shiv Sena: राज्यपालांच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी

एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर देखील ११ जुलै रोजीच सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

Fri, 08 Jul 202204:10 AM IST

Share Market: शेअर बाजारात उत्साह; सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वधारला

मागील तीन दिवसांपासून शेअर बाजारात उत्साह दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स व निफ्टी वधारले आहेत. सेन्सेक्स आज २८० अंकांनी वाढला असून निफ्टी ८३ अंकांनी वर गेला आहे.

Fri, 08 Jul 202203:38 AM IST

Uddhav Thackeray: राज्यपालांच्या 'त्या' निर्णयाला शिवसेनेचे सुप्रीम कोर्टात आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केल्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसंच अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणीलासुद्धा शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले आहे.

Fri, 08 Jul 202203:14 AM IST

जपानचे माजी PM शिंजो आबे यांच्यावर गोळीबार

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला आहे. एका कार्यक्रमातते बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे. यात शिंजो आबे हे गंभीर जखमी झाले आहेत.

<p>जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे</p>
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (फोटो - एपी)

Fri, 08 Jul 202202:29 AM IST

Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार

राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात पहिले २,३ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.