शिक्षण अध्यापन शास्त्राची पदवी व पदविका घेतलेल्या व सध्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. शिक्षक भरती संदर्भातशिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच तब्बल ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर म्हणाले महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षक भरती असून त्यानंतर राज्यातील कोणत्याही शाळेत शिक्षकांची कमतरता भासणार नाही.
शिक्षणमंत्री केसरकर यांच्या घोषणेमुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शिक्षकांच्यासर्वबदल्या रद्द केल्याचंही केसरकर यांनी यावेळी म्हटले. ५० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी भरती असेल तर त्यानंतर शिक्षकांअभावी शाळा ओस परणार नाहीत.
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर म्हणाले की,विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी स्थानिक शालेय समितीवर आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये,अशा सूचनाही केसरकर यांनी शालेय समितीला दिल्या आहेत.
दरम्यान शाळा सुरू होऊन आता अकरा दिवस उलटले आहे. परंतू तरी देखील शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल ही घोषणा नावापूर्तीच राहिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आजही गणवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शाळांमध्ये दिसून आले आहे.
संबंधित बातम्या