मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 27 August 2022 Live: उदय लळीत घेणार आज सरन्यायाधीश पदाची शपथ

Uday Lalit(ANI)

Marathi News 27 August 2022 Live: उदय लळीत घेणार आज सरन्यायाधीश पदाची शपथ

Marathi News Live Updates : न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे आज देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

Sat, 27 Aug 202216:42 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सरन्यायाधीश उदय लळीत यांचे अभिनंदन

मुंबई  : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमुर्ती उदय लळीत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. न्यायमुर्ती लळीत यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. "महाराष्ट्र सुपुत्र न्या.लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत करणारी ठरेल," असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Sat, 27 Aug 202210:40 IST

MLA Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार; संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडी चौकशी करणार

आमदार रोहित पवार ज्या कंपनीचे काही काळ संचालक होते ,त्या ग्रीन एकर कंपनीच्या चौकशीला ईडीने हिरवा कंदील दिला आहे. या कंपनीने बेहिशेबी मालमत्ता परदेशात पाठवल्याची तक्रार आहे. या कंपनीत राकेश वाधवान यांच्याही हस्तक्षेप होता. तब्बल १० कोटींचे अवेधरित्या व्यवहार झाल्याचे कळत आहे.

Sat, 27 Aug 20229:06 IST

नाशिक: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आश्रम शाळेला भेट 

नाशिक जिल्हातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी सेवा समितीद्वारे संचालित मातोश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक आश्रम शाळा, रोहिले येथे आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. आदिवासी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकृतीही त्यांनी पाहिल्या. 

<p>विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आश्रम शाळेला भेट</p>
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आश्रम शाळेला भेट

Sat, 27 Aug 20228:32 IST

Sachin Sawant: गणेशभक्तांना टोलमाफी दिल्याचा आनंदच आहे, पण… सचिन सावंत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

'गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सवलत दिली तर आनंद आहे. पण मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्त व्हावेत ही मागणी मी अनेक दिवस आधी केली आहे‌. पंतप्रधान मोदी हे रेवडी वगैरे काहीतरी म्हणत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला रेवडी काय असते हे सांगितलं तर आमचं अज्ञान दूर होईल,' असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हाणला आहे.

Sat, 27 Aug 20227:28 IST

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर त्यांचं आगमन झालं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोश्यारी यांचं स्वागत केलं.

Sat, 27 Aug 20225:28 IST

High Court : राज्यातील अवैध धार्मिक स्थळं बंद करा; हायकोर्टाचे आदेश!

Kerala High Court : कोणतीही कायदेशीर मान्यता नसलेले आणि बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांना किंवा प्रार्थनास्थळांना बंद करण्याचे आदेश केरळच्या हायकोर्टानं दिले आहे. त्यामुळं आता कोर्टाच्या या निर्देशानंतर राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Sat, 27 Aug 20224:30 IST

U U Lalit: उदय लळीत घेणार आज सरन्यायाधीश पदाची शपथ

न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे आज देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. एन. व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. लळीत यांचा कार्यकाळ जेमतेम तीन महिन्यांचा असेल. ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

Sat, 27 Aug 20223:06 IST

Raosaheb Danve : केंद्रियमंत्री रावसाहेब दानवेंकडून संभाजी ब्रिगेडचं कौतुक; शिवसेनेला टोला!

Raosaheb Danve On Sambhaji Brigade : शिवसेना सत्तेत असताना त्यांनी संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याची गरज होती, त्यांनी त्यावेळी त्यांच्याशी युती केली नाही, परंतु संभाजी ब्रिगेड ही अत्यंत चांगलं काम करणारी संघटना असल्याचं म्हणत केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावत संभाजी ब्रिगेडचं कौतुक केलं आहे.

Sat, 27 Aug 20222:59 IST

Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम; डायमंड लीगचं विजेतेपद मिळवत रचला इतिहास!

Neeraj Chopra Diamond League : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं आणखी एक विक्रम रचत इतिहास रचला आहे. कारण त्यानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगमध्ये ८९.०८ मीटर भाला फेकत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. त्यामुळं आता तो पुढच्या वर्षी हंगेरीतल्या बुडापेस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे.

Sat, 27 Aug 20221:51 IST

Shinde-Fadnavis Govt : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी!

Jalgaon News : राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर वादाची ठिणगी पडली आहे. कारण आता शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी एकमेकांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पाचोरा नगरपालिकेत भाजपनं २०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार आणि भाजपच्या तालुक्याध्यक्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे.

Sat, 27 Aug 20221:27 IST

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते, बायडन ११ व्या स्थानावर!

PM Narendra Modi : अमेरिकेतील ‘डेटा इंटेलिजेंट फर्म द मॉर्निंग कन्सल्ट’नं केलेल्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. दुसऱ्या नंबरवर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मेनुएल लोपेज ओब्रोडोर असून तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एँथोनी अल्बेनेस आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ४१ रेटिंगसह ११ वे स्थान मिळाले आहे.

Sat, 27 Aug 20221:24 IST

Central Railway Megablock : मध्य रेल्वेवर उद्या या मार्गावार मेगाब्लॉक!

Central Railway Megablock : मुंबईत मध्य रेल्वेच्या काही भागांमध्ये उद्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यात वाशी-नेरुळ-पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वडाळा रोड-वाशी-बेलापूर-पनवेल या मार्गासह वांद्रे-गोरेगाव या रुटची रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

Sat, 27 Aug 20221:24 IST

देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर!

DCM Devendra Fadnavis And Aditya Thackeray Nagpur Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे हे नागपूरात शिवसेनेचा मेळावा घेणार असून आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या घरी ते भेट देणार आहेत. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज नागपूरच्या दौऱ्यावर असल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.

Sat, 27 Aug 20221:23 IST

Kirit Somaiya : अनिल परबांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक; साई रिसॉर्टपर्यंत २८ किमीची यात्रा करणार!

Kirit Somaiya vs Anil Parab : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परबांचा दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दापोली मुरुड समुद्रकिनाऱ्यावर परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट बांधला असून त्याविरोधात दापोलीतल्या साई रिसॉर्टपर्यंत २८ किलोमीटरची यात्रा काढणार असल्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली आहे.