मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 26 November 2022 Live Updates Marathi Breaking News

शिंदे गटाचे कामाख्या दर्शन

Marathi News 26 November 2022 Live: मुख्यमंत्र्यांनी घेतलं कामाख्या मातेचं दर्शन, केली विशेष पूजा

Marathi News Live Updates : भीमा कोरेगाव प्रकरणी गेली अडीच वर्ष जेलमध्ये असलेले आयआयटीचे प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची आज नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला होता.

Sat, 26 Nov 202202:44 PM IST

मुख्यमंत्री शिंदे व आमदार-खासदारांनी घेतलं कामाख्या मातेचं दर्शन, केली विशेष पूजा

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शन घेतलं. तिथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर मंत्री, आमदार, खासदार यांनी देखील देवीचे दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आता सर्वजण पुन्हा एकदा हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. 

Sun, 27 Nov 202202:04 AM IST

भीमा-कोरेगाव: आनंद तेलतुंबडे यांची जामिनावर सुटका

भीमा कोरेगाव प्रकरणी गेली अडीच वर्ष जेलमध्ये असलेले आयआयटीचे प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची आज नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला होता.

Sat, 26 Nov 202209:37 AM IST

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व प्रख्यात रंगकर्मी विक्रम गोखले यांचं आज निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी आज दुपारच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Vikram Gokhale
Vikram Gokhale

Sat, 26 Nov 202203:33 AM IST

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद; दोन्ही सरकारांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra-Karnataka bus service : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावाद पेटल्यानंतर आता बससेवा बंद करण्याचा निर्णय दोन्ही राज्यांतील सरकारनं घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद करण्यात आल्याचं समजतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोट आणि सांगलीतील जत तालुक्यावर दावा ठोकल्यानंतर दोन्ही राज्यातील सीमावादाचा प्रश्न पेटला आहे.

Sat, 26 Nov 202202:05 AM IST

उद्धव ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर; शेतकरी मेळाव्यात शिंदे गटावर डागणार तोफ

Uddhav Thackeray In Buldhana : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी चिखलीत शेतकरी मेळावा घेणार असून संध्याकाळी जाहीर सभा देखील घेणार आहेत. जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेल्यामुळं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

Sat, 26 Nov 202202:04 AM IST

Local Megablock : मुंबईत पाच तासांचा मेगाब्लॉक; लोकल सेवेवर होणार परिणाम

Mumbai Megablock : मुंबईतील मुलुंड-माटुंगा आणि डाउन जलद मार्गावर रेल्वे प्रशासनानं तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. रुळांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या सकाळी ११.०५ ते ४.५५ वाजेपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. याशिवाय सीएसटी-चुनाभट्टी-वांद्रे आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sat, 26 Nov 202202:02 AM IST

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाचे आमदार आज गुवाहाटीच्या दौऱ्यावर; कामाख्या देवीचं घेणार दर्शन

Eknath Shinde Guvahati Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील ४० आमदार आज आसामची राजधानी गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी आठ वाजता सर्व नेते मुंबईतून विशेष विमानानं गुवाहाटीसाठी रवाना होतील. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी तिथं ज्या लोकांनी मदत केली त्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.