Marathi News 20 October 2022 Live: भांडूपमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत-maharashtra news 20 october 2022 live updates marathi breaking news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 20 October 2022 Live: भांडूपमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Live blog
Live blog

Marathi News 20 October 2022 Live: भांडूपमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Suraj Sadashiv Yadav 02:06 AM ISTOct 21, 2022 07:36 AM
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates : शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Thu, 20 Oct 202204:23 PM IST

भांडूपमध्ये तांत्रिक बिघाड,  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील मध्य रेल्वेमध्ये सायंकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. परिणामी साडे सात ते आठ वाजेपर्यंत परळ रेल्वेसाथानकावर रेल्वे जागेवरच थांबलेल्या आहेत. भांडूप रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले जात आहे.

Thu, 20 Oct 202210:51 AM IST

Nana patole: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास शिंदे फडणवीस सरकारची टाळाटाळ - नाना पटोले

राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटानं पुरता खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकार फारसे इच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतपीके वाया गेली आहेत हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती परंतु शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Thu, 20 Oct 202210:47 AM IST

Redefine 2022: कमिंस इंडियातर्फे ‘रिडीफाइन 2022’ फ्लॅगशिप बी-स्कूल केस स्टडी स्पर्धा

कमिंस इंडियाने भारतातील १२ बिझिनेस स्कूल्सच्या विद्यार्थ्यांसाठी 'रिडीफाइन’ ही राष्ट्रीय स्तरावरील बी-स्कूल केस स्टडी स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सादर करेल आणि त्यांना त्यांचे धोरणात्मक, नाविन्यपूर्ण आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढीसाठी प्रोत्साहन देईल. अनेक फेऱ्या असलेल्या स्पर्धेची सांगता २२ व २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे येथील कमिंस इंडिया ऑफिस कॅम्पसमध्ये होणाऱ्या दोन दिवसीय ग्रँड फिनाले इव्हेंटने होईल. जिंकणाऱ्या संघाला रोख बक्षीस मिळेल आणि कमिंस इंडियाच्या नेतृत्वासह मेंटरशिप प्रोग्रामसाठी त्यांची नोंदणी केली जाईल.

Thu, 20 Oct 202210:45 AM IST

Sanjay Deshmukh: माजी मंत्री संजय देशमुख यांनी बांधलं शिवबंधन; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश 

माजी मंत्री संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळच्या दिग्रज मतदारसंघातून १९९९ आणि २००४ असे सलग दोन वेळा ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनीही आज पक्षात प्रवेश केला. 

Thu, 20 Oct 202206:49 AM IST

CM Eknath Shinde: राज्य सरकारकडून प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान

राज्य सरकारच्या वतीनं यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्या निमित्तानं आज मंत्रालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याची शपथ घेतली.

Thu, 20 Oct 202204:58 AM IST

Stock Market: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात पुन्हा घसरण

मागील तीन दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा निरुत्साह दिसत आहे. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला असून निफ्टी ४५ अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.

Thu, 20 Oct 202202:51 AM IST

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद

NCP Leader Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात युक्तिवाद होणार आहे. देशमुख यांच्या वकिलांनी तपास यंत्रणा वेळकाढूपणा करतं असल्याचा आणि राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद कोर्टात केला होता. त्यानंतर कोर्टानं सीबीआयच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणार असल्यानं सीबीआय कोर्टात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Thu, 20 Oct 202202:44 AM IST

Cabinet Meeting : शिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणार चर्चा!

Shinde-Fadnavis Govt Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दिवाळीचा सण काही तासांवर येऊन ठेपलेला असताना राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच दिवाळीनिमित्त गरजूंना शंभर रुपयात वस्तु वाटप करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारनं घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीविषयीही मुख्यमंत्री माहिती घेतील. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीही आजच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Thu, 20 Oct 202202:26 AM IST

कर्नाटकात पावसाचा तडाखा, भिंत कोसळून गाड्यांचे नुकसान

कर्नाटकला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बेंगलुरु शहरातील एक भिंत पावसामुळे पडली. यातील भिंतीचा काही भाग गाड्यांवर पडल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Thu, 20 Oct 202202:21 AM IST

MCA Election: एमसीए निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज होत असून यामध्ये ३८० मतदार मतदान करणार आहेत. एमसीएच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे एकत्र पॅनेल आहे. त्यांच्याकडून अमोल काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधात माजी क्रिकेटपटू संदिप पाटील हे आहेत.