मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 20 November 2022 Live Updates Marathi Breaking News

Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra in Jalgaon Jamod Dist Buldhana

Marathi News 20 November 2022 Live: राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज बुलडाण्यात

Marathi News Live Updates : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे पोहचली. यावेळी त्यांनी नागरिकांशी असा संवाद साधला

Sun, 20 Nov 202208:13 AM IST

SPPU Pune : अधिसभा निवडणुकीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मतदान सुरू

SPPU General Body Elections 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिसभा निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. १० जागांसाठी तब्बल ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

Sun, 20 Nov 202205:00 AM IST

आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; औरंगाबादेत राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Satish Chavan vs Bhausaheb Patil Chikatgaonkar : राष्ट्रवादीचे आमदार सतिश चव्हाण हे औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केला आहे. त्यामुळं औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. मी राष्ट्रवादी वाढवण्यासाठीच प्रयत्न करत असून चिकटगावकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा आमदार सतिश चव्हाण यांनी केला आहे.

Sun, 20 Nov 202204:55 AM IST

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आज येणार एकत्र; प्रबोधनकार डॉट कॉम वेबसाईटचं होणार लोकार्पण

Prakash Ambekar and Uddhav Thackeray In Mumbai : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज एकाच मंचावर येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचितमध्ये राजकीय युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज ठाकरे-आंबेडकर यांच्या हस्ते प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचं लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Sun, 20 Nov 202202:51 AM IST

मध्य रेल्वेचा २७ तासांचा जम्बोब्लॉक, लोकलसह अनेक रेल्वे गाड्याही रद्द

मध्य रेल्वेवर २७ तासांचा जम्बोब्लॉक सुरू झाला आहे. कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. यामुळे लोकल सेवेसह रेल्वेसेवेवरसुद्धा परिणाम होणार आहे. लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. १९ नोव्हेंबरला रात्री ११ वाजेपासून ते २१ नोव्हेंबरला मध्यरात्री दोन वाजेपर्यंत असा २७ तासांचा हा जम्बोब्लॉक असणार आहे.

Sun, 20 Nov 202202:46 AM IST

मस्कने घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांची ट्विटरवर एन्ट्री

एलन मस्क यांनी घोषणा केल्यानंतर ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा रिस्टोर झाले आहे. मस्कने एक सर्वेक्षण देखील सुरू केले होते, ज्यामध्ये ते ट्विटर यूजर्स विचारत होते की, ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करावे की नाही?