मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 19 October 2022 Live Updates Marathi Breaking News

राहुल गांधींची सभा बुलढाण्यात बंद पाडण्याचा प्रयत्न; सभेत अज्ञाताने फोडले फटाके

Marathi News 19 November 2022 Live: राहुल गांधींची सभा बुलढाण्यात बंद पाडण्याचा प्रयत्न

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील भास्तान या गावी कॉर्नर सभा सुरू असताना अज्ञाताने फटाके फोडत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच फटाके फोडल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण अर्धवट सोडले.

Sat, 19 Nov 202202:29 PM IST

राहुल गांधींची सभा बुलढाण्यात बंद पाडण्याचा प्रयत्न; सभेत अज्ञाताने फोडले फटाके

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील भास्तान या गावी कॉर्नर सभा सुरू असताना अज्ञाताने फटाके फोडत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच फटाके फोडल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण अर्धवट सोडले.

Wed, 19 Oct 202212:01 PM IST

Nana Patole: मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल - नाना पटोले

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे, ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं दांडगा अनुभव व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Wed, 19 Oct 202210:46 AM IST

Sharad Pawar: विरोधी पक्ष मजबूत करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक - शरद पवार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच, यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असंही पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Wed, 19 Oct 202208:50 AM IST

IND vs NZ: भारत - न्यूझीलंड सराव सामना पावसामुळे रद्द

ब्रिस्बेनमध्ये संततधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. याच मैदानावर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळवण्यात आला. तोही अनिर्णित राहिला.

Wed, 19 Oct 202207:45 AM IST

IND vs NZ: भारत - न्यूझीलंड यांच्यातील सराव सामन्याला उशीर, ब्रिस्बेनमध्ये पाऊस

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज ब्रिस्बेन येथे सराव सामना खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे टॉस उशीराने होणार आहे. पावसामुळेच या मैदानावरील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.

Wed, 19 Oct 202205:51 AM IST

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी वाहिली २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धाजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ताज हॉटेल, मुंबई येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस गुटेरेस यांनी हॉटेल ताज येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धाजली वाहिली. 

<p>UN Secretary General Antonio Guterres pays tributes to the victims of the 26/11 terror attacks at the Taj Mahal Palace hotel in Mumbai</p>
UN Secretary General Antonio Guterres pays tributes to the victims of the 26/11 terror attacks at the Taj Mahal Palace hotel in Mumbai

Wed, 19 Oct 202205:42 AM IST

जनता दल (युनायटेड) च्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आमदार कपील पाटील

जनता दल (युनायटेड) पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आमदार कपील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनता दल (यु) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे खासदार राजीव रंजन ऊर्फ लल्लन सिंह यांनी ही नियुक्ती केली आहे.

<p>MLC Kapil Patil</p>
MLC Kapil Patil

Wed, 19 Oct 202203:54 AM IST

Congress President Election Result: काँग्रेस पक्षाला आज मिळणार नवा अध्यक्ष, दहा वाजेपासून मतमोजणी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत आहे. तब्बल दोन दशकांनंतर काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. हा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील असणार आहे. हा मान कोणाला मिळणार याकडं लक्ष लागलं आहे.

Wed, 19 Oct 202203:50 AM IST

Stock Market: शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स वधारला

मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम असून आजही उत्साहाचं वातावरण आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीही ७५ अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Wed, 19 Oct 202203:36 AM IST

महापालिका निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

महापालिकेच्या निवडणूका संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा निर्णय होणार आहे. राज्य सरकारने केलेले प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षपदाची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान देण्यात आले होते. यामुळे आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुका कधी होणार याची स्पष्टहोणार आहे. यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.