मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 18 July 2022 Live Updates Marathi Breaking News

Balasaheb Thackeray

Marathi News 18 July 2022 Live: शिवसेना ही बाळासाहेबांचीच! फुटीर ते फुटीरच- राऊत

Daily News Live Update: राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती व क्रीडा जगतातील दिवसभरातील सर्व ताज्या घडामोडी

Mon, 18 Jul 202201:00 PM IST

Sanjay Raut: दिल्लीत कॉमेडी एक्स्प्रेस २ सुरू आहे - संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे गटाला टोला

फुटीर गट मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कशी करू शकतो? मुळात त्यांना कायदेशीर आधार आहे का? हा विनोद आहे. कॉमेडी एक्स्प्रेसचा एक सीझन मुंबईत झाला आता दिल्लीत दुसरा सीझन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचीच आमदारकी धोक्यात आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. मातोश्री व शिवसेना भवनातून हा पक्ष चालतो. फुटीर हे फुटीरच असतात. - संजय राऊत

Mon, 18 Jul 202211:28 AM IST

Nana Patole: भाजपच्या धोरणांना काँग्रेस देणार 'भारत जोडो' अभियानाच्या माध्यमातून उत्तर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डी येथे १ व २ जून रोजी घेतलेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबाजणी राज्यभर केली जाणार आहे. भाजपच्या ‘भारत तोडो’ ला काँग्रेस ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. शिर्डी घोषणापत्र व कृतीकार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Mon, 18 Jul 202210:01 AM IST

Brinda karat: यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार वृंदा करात यांना जाहीर

क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाकडून देण्यात येणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यंदा ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यांना जाहीर झाला आहे. विटा इथं क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात ६ ऑगस्टला प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. तारा भवाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, २१ हजार रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

Mon, 18 Jul 202207:51 AM IST

राष्ट्रपती निवडणुकीत शिंदे गटाला धक्का; एका आमदाराच्या मतदानावर बंदी!

Presidential Election 2022 Voting In Maharashtra : आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यातील विधानसभेत मतदान सुरू आहे. त्यात आता मुख्यमंत्री शिंदेगटाला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण शिंदगटातील आमदार महेंद्र दळवी यांना मतदान करता येणार नाहीये. एका गुन्ह्यात ते आरोपी असल्याचं सिद्ध झाल्यानं त्यांना मतदान करू शकणार नाही. सुरू असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील २८८ पैकी २८३ आमदार मतदान करू शकणार आहे. कारण आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये असल्यानं त्यांना मतदान करता येणार नाहीये, तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्यानं ते मतदान करणार नसल्याची माहिती आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde

Maharashtra Chief Minister Eknath Shinde (HT)

Mon, 18 Jul 202207:13 AM IST

Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्याकडं करण्यात आली.

Mon, 18 Jul 202207:06 AM IST

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांना माझगाव कोर्टाचं समन्स.

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात म्हणणं मांडण्यासाठी माझगाव न्यायालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

Mon, 18 Jul 202207:06 AM IST

Aaditya Thackeray: मुर्मू यांना पाठिंबा का दिला?; आदित्य ठाकरे यांनी सांगितलं!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतीपदाची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते. ते सर्वोच्च पद आहे आणि योग्य उमेदवारालाच मतदान झालं पाहिजे, असं आम्हाला वाटतं. त्यामुळंच आम्ही हा निर्णय घेतला आहे - आदित्य ठाकरे

Mon, 18 Jul 202206:59 AM IST

ST Bus Accident: इंदूरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू

इंदूरहून पुण्याला येणारी एक बस मध्य प्रदेशातील धार येथे नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ ते १५ जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

Mon, 18 Jul 202205:59 AM IST

Presidential Election 2022: माजी पतंप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले होते.

Manmohan Singh

Manmohan Singh

Mon, 18 Jul 202205:38 AM IST

Presidential Election 2022 LIVE : नितीन राऊतांचं मतदान रद्द करा; बबनराव लोणीकरांची मागणी!

आज राष्ट्रपतीपदाची निवडणुक होत असल्यानं त्यासाठी विधानसभेत निर्वाचित आमदारांनी मतदान करायला सुरुवात केली आहे. परंतु त्यातच आता भाजप आमदारानं कॉंग्रेसच्या आमदाराच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. 'नितीन राऊत हे मतदान होणाऱ्या सभागृहात ३० मिनिटं आधी कसे गेले?, माझं नाव पहिलं लिहिलेलं असताना नितीन राऊतांनी नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा' दावा करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी नितीन राऊतांचं मतदान बाद करण्याची मागणी केली आहे.

Presidential Election 2022 LIVE

Presidential Election 2022 LIVE (HT)

Mon, 18 Jul 202205:10 AM IST

Shiv Sena: शिवसेनेच्या खासदारांची थोड्याच वेळात बैठक

शिवसेनेनं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना तर, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसा व्हीप शिवसेनेचे प्रतोद राजन विचारे काढणार आहेत. तसंच, थोड्याच वेळात संसद भवनात शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

Mon, 18 Jul 202204:24 AM IST

PM Narendra Modi: संसदेत खुल्या मनानं चर्चा व्हायला हवी - नरेंद्र मोदी

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार असल्यानं हे अधिवेशन महत्त्वाचं आहे. संसदेत खुल्या मनानं चर्चा झाली पाहिजे. सर्व खासदारांनी यावर विचार करावा, असं आवाहन मोदी यांनी केलं.

Mon, 18 Jul 202204:14 AM IST

Share Market News: शेअर बाजारात किंचित तेजी

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसत आहे. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला आहे तर, निफ्टी १२५ अंकांनी चढून १६,१७० वर ट्रेड करत आहे.

Mon, 18 Jul 202204:06 AM IST

Vidarbha Rain Update: निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व दरवाजे खुले

धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे १८ जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजता १०० सेंमीनं उघडण्यात आले. लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातून १६२५.१३ घन.मी/से. विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Mon, 18 Jul 202204:04 AM IST

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू ७० टक्के मतं मिळवून विजयी होतील - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व खासदार एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील आणि त्या ७० टक्के मतं मिळवून विजयी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीमध्ये कुणाला रस आहे असं वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.