मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 16 September 2022 Live Updates Marathi Breaking News

Sharad Pawar

Marathi News 16 September 2022 Live: राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Daily News Live Updates in Marathi: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. पक्षाध्यक्षपदी शरद पवार कायम असून प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

Fri, 16 Sep 202211:50 AM IST

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार कायम असून प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. खासदार सुनील तटकरे आणि आमदार जीतेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी वर्णी लागली आहे. तर, नरेंद्र वर्मा यांच्याकडं राष्ट्रीय सरचिटणीस पदाबरोबरच राष्ट्रीय प्रवक्ते व मीडिया इन चार्ज ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Fri, 16 Sep 202210:04 AM IST

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध. कोर्टात मांडलं म्हणणं.

पत्रा चाळ घोटाळ्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर ईडीनं आज आपलं लेखी म्हणणं मांडताना राऊत यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे.

Fri, 16 Sep 202209:48 AM IST

PM Modi Birthday: पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपचा 'सेवा पंधरवडा' उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र भाजप १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा हा उपक्रम राबवणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर येथे दिली. या कालावधीत स्वच्छता, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम होणार असून त्यात पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार सक्रिय सहभाग नोंदवतील, असं त्यांनी सांगितलं.

Fri, 16 Sep 202209:40 AM IST

Punjab Kings Head Coach: पंजाब किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून अनिल कुंबळेला डच्चू

मुंबई इंडियन्सनंतर 'पंजाब किंग्ज'नंही संघाचा प्रशिक्षक बदलला आहे. माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या जागी ट्रेवर बेलिस याच्याकडं प्रशिक्षक पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. कुंबळेच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली न झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Fri, 16 Sep 202208:50 AM IST

Share Market: आणखी किती खाली जाणार? सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळपासून होत असलेली पडझड सुरूच असून सध्या सेन्सेक्स एक हजारांहून अधिक अंकांनी गडगडला आहे. निफ्टीतही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.

Fri, 16 Sep 202207:47 AM IST

जीतकर हारनेवाले को खोके सरकार कहते है; आदित्य ठाकरेंचा घणाघात

जीतकर हारनेवाले को खोके सरकार कहते है. एक लाख नोकऱ्या राज्यात येणार होत्या त्या गेल्या कशा? जो प्रोजेक्ट १०० टक्के महाराष्ट्रात येणार होता तो गेला कसा? हेच कुणाला माहिती नाही. या प्रश्नाची उत्तरं यांना देता येत नाही आणि आमच्यावरच आरोप करतायत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Fri, 16 Sep 202207:38 AM IST

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा; बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा रत्नागिरीत पोहोचली असून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात त्यांची जाहीर सभा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'खोके सरकार' लोकांसाठी काहीही करताना दिसत नाही. आमच्या योजनांचं श्रेय घेण्याचं काम सुरू आहे, असं टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडलं. 

Fri, 16 Sep 202207:26 AM IST

Maharashtra Rain: मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस

मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. नवी मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. तर, मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे.

Fri, 16 Sep 202206:08 AM IST

Gautam Adani: गौतम अदानी ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत

गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातील ‘टॉप टेन’ अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्कनंतर आता गौतम अदानी हे एकमेव आहेत. फोर्ब्स रिअल टाइम बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी यांनी बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकलं आहे. 

Fri, 16 Sep 202205:07 AM IST

Pune Rain : पुण्यात मुळशी धरण परिसरात तूफान पाऊस; धरणातून १० हजार ५६० क्युसेकने विसर्ग सुरू

मुळशी तालुक्यात तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे मुळशी धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. यामुळे आज सकाळी धारच्या मुख्य सांडव्यातून सुरू असेलेला विसर्ग ५ हजार ६५८ वरून १३ हजार २०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यात आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात याव, असे आवाहन बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.

Fri, 16 Sep 202204:57 AM IST

Satara Rain : कोयना धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून ४१ हजार ९५८ क्युसेकने विसर्ग सुरू

यना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने आज शुक्रवारी सकाळी १० वाजता धरणातून नदीपात्रात एकूण ४१ हजार ९५८ क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Fri, 16 Sep 202204:54 AM IST

Pune Rain : पुण्यात सकाळपासून पावसाची तूफान हजेरी; धरणे भरली

पुण्यात कल रात्री पासून जोरदार पासून सुरू आहे. पावसामुळे धरणे भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात वाढ होत आहे. येत्या ३ ते ४ तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे २२,००० ते २५,००० क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

<p>खडकवासला धरण&nbsp;</p>
खडकवासला धरण&nbsp;

Fri, 16 Sep 202204:05 AM IST

Share Market: मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी गडगडला

मुंबई शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून बरीच अस्थिरता दिसत आहे. सेन्सेक्सचा सापशिडीचा खेळ सुरू आहे. काल (गुरुवार) सकाळी उसळलेला सेन्सेक्स बाजार बंद होता होता ४०० अंकांनी कोसळला होता. तीच स्थिती आज कायम असून आज सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी गडगडला आहे. निफ्टीतही घसरण झाली आहे.

Fri, 16 Sep 202203:04 AM IST

Lucknow Rain : लखनऊमध्य मुसळधार पाऊस, भिंत कोसळून १० जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. यात एका ठिकाणी भिंत कोसळून दहा जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

Fri, 16 Sep 202202:31 AM IST

Aurangabad: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज अनावरण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण होणार आहे.

Fri, 16 Sep 202202:30 AM IST

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी SCO परिषदेसाठी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय शिखर परिषदेसाठी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. समरकंद इथं होणाऱ्या दोन दिवसीय SCO शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.