मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 15 September 2022 Live Updates Marathi Breaking News

Anil Agarwal(PTI)

Marathi News 15 September 2022 Live: अनिल अग्रवाल यांच्या विधानावरून काँग्रेसनं राज्य सरकारला घेरले

Daily News Live Updates in Marathi: वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्या एका विधानावरून काँग्रेसनं राज्य सरकारला घेरलं आहे.

Thu, 15 Sep 202212:20 PM IST

Vedanta Foxconn: वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्या विधानावरून काँग्रेसनं राज्य सरकारला घेरले

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यावरून महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सरकार घाबरले असून डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून शिंदे फडणवीस सरकारकडून याचे खापर मविआ सरकारवर फोडले जात आहे. दुसरीकडे हा प्रकल्प गुजरात राज्यात नेण्याचा निर्णय आधीच झाला होता असे विधान वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांनी केले आहे. निर्णय आधीच झाला होता तर मग महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १५ जुलै २०२२ रोजी हाय पॉवर कमिटीची बैठक सगळ्या सोयी सुविधा देण्यासाठी का घेण्यात आली होती? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

Thu, 15 Sep 202209:24 AM IST

Jayant Patil: कामगार कायद्यात सुधारणांच्या नावाखाली कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न; जयंत पाटील यांचा आरोप

आज देश पातळीवर कामगारांविषयी जे धोरण आखले जात आहे त्या धोरणांनुसार कामगारांचे संरक्षण कसे टिकवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशाच्या कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावावर जो बदल केला जात आहे त्यामुळे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. याने इथल्या शोषित बांधवांचे नुकसान होणार आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Thu, 15 Sep 202207:48 AM IST

Share Market: सकाळच्या सत्रात वधारलेला सेन्सेक्स पुन्हा घसरला

सकाळच्या सत्रात उसळलेल्या सेन्सेक्सनं अचानक लाल निशाण फडकावलं आहे. सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी घसरला असून निफ्टी देखील १८ हजारांच्या खाली आला आहे.

Thu, 15 Sep 202205:08 AM IST

Rachel Haynes: ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू रॅचेल हेन्स हिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलिया महिला संघाची उपकर्णधार आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती रॅचेल हेन्स हिनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगामी महिला बिग बॅश लीग ही तिची शेवटची स्पर्धा असेल असं ३५ वर्षीय हेन्स म्हटंल आहे. दशकभराहून अधिक काळ ऑस्ट्रेलियासाठी खेळणाऱ्या हेन्स हिनं ८४ टी-ट्वेटी, ७७ एकदिवसीय आणि ६ कसोटी सामने खेळले आहेत.

Thu, 15 Sep 202204:45 AM IST

Coronavirus: देशात मागील २४ तासांत ६,४२२ करोना रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांत देशात ६,४२२ करोना रुग्णांची नोंद झाली असून ५,७४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४६,३८९ जणांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन संसर्गाचा दर २.०४ टक्के इतका आहे.

Thu, 15 Sep 202204:25 AM IST

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर श्रीनगर जिल्ह्यातील नौगाम भागात स्थानिक पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अय्याज रसूल नझर आणि शाहीद अहमद अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही अन्सार गझवत अल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. अलीकडंच पुलवामा इथं एका मुजराचा खून करण्यात आला होता. त्यात या दोघांचा सहभाग होता.

Thu, 15 Sep 202204:00 AM IST

Covid 19 : देशात गेल्या २४ तासात ६४२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

भारतात गेल्या २४ तासात ६ हजार ४२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दिवसभरात ५ हजार ७४८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या देशात ४६ हजार ३८९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Thu, 15 Sep 202203:54 AM IST

Share Market: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टीनं ओलांडला १८ हजारांचा टप्पा

शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५० अंकांहून अधिक वधारला असून निफ्टीने १८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

Thu, 15 Sep 202202:53 AM IST

Vedanta-Foxconn Project : वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळं युवासेनेचं आज राज्यभरात आंदोलन

Vedanta-Foxconn Project In Talegaon Pune : वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत. त्यातच आता याच मुद्द्यावरून आज राज्यभरात आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर हे आंदोलन केलं जाणार असल्याचं युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

Thu, 15 Sep 202202:52 AM IST

Congress : गोव्यात कॉंग्रेसची महत्त्वाची बैठक, बंडखोर आमदारांवर होणार कारवाई?

Congress mlas join bjp in goa : गोव्यामध्ये कॉंग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. कारण ११ पैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा समावेश आहे. परंतु आता पक्षात लागलेल्या गळतीनंतर गोव्यात कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यात बंडखोर आमदारांविरोधात कॉंग्रेस पक्ष कोर्टात जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Thu, 15 Sep 202202:52 AM IST

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला जाणार; एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारात होणार सहभागी

Droupadi Murmu London Visit : इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. एलिझाबेथ यांच्या निधनाचा शोक व्यक्त करण्यासाठी मुर्मू १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत लंडनमध्ये असणार आहेत.

Thu, 15 Sep 202202:40 AM IST

Covid-19: कोरोनाचा अंत जवळ आलाय; WHO प्रमुखांचे विधान

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी मार्च २०२० नंतर सर्वात कमी नोंदवली गेलीय. कोरोनाचा अंत आता दिसत असल्याचं WHO ने म्हटलं आहे.