मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 12 September 2022 Live Updates Marathi Breaking News

Ajit Pawar

Marathi News 12 September 2022 Live: पितृपक्षाचं कारण सांगणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी सुनावले

Daily News Live Updates in Marathi: पितृपक्ष असल्यानं कार्यभार न स्वीकारणाऱ्या मंत्र्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हल्ला चढवला आहे.

Mon, 12 Sep 202212:49 PM IST

Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाला मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा व निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न करणार - रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष असून आगामी काळात पक्षाला मान्यताप्राप्त पक्ष करून निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उगवता सूर्य हे रिपब्लिकन पक्षाचं निवडणूक चिन्ह पुन्हा मिळविण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न असून उगवता सूर्य किंवा मशाल किंवा तराजू यांपैकी एक चिन्ह मिळू शकते. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत दोन खासदार आणि विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणण्याचा निर्धार पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. 

Mon, 12 Sep 202211:01 AM IST

Lumpy Skin Disease: लम्पी आजारामुळं जनावरं दगावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी तसेच लम्पी आजाराने ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Mon, 12 Sep 202210:13 AM IST

Ajit Pawar slams Minister: पितृपक्ष असल्यामुळं मंत्रालयात न येणाऱ्या मंत्र्यांवर अजित पवार बरसले

पितृपक्ष असल्यानं कार्यभार न स्वीकारणाऱ्या मंत्र्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हल्ला चढवला आहे. 'मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत. कामं रखडली आहेत आणि मंत्री पितृपक्षाची कारणं देतायत. असं कुठं असतं का? जग कुठं चाललंय आणि आपण काय करतोय? आणखी कशाकशाची बाधा यांना येणार आहे हेच कळायला मार्ग नाही, असा टोला अजित पवार यांनी हाणला आहे.

Mon, 12 Sep 202208:50 AM IST

Ajit Pawar: मी अजिबात नाराज नाही. मीडियात चुकीच्या बातम्या येतायत - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलू न दिल्यानं आपण नाराज असल्याचं वृत्त अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलं आहे. 'मीडियात दिशाभूल करणाऱ्या बातम्या दिल्या जात आहेत. अनेक नेत्यांना अधिवेशनात बोलायला मिळालं नाही. त्याबद्दल मी आधीच खुलासा केला आहे. मी अजिबात नाराज नाही. अन्य कुठलाही नेता नाराज नाही, असं ते म्हणाले.

Mon, 12 Sep 202208:47 AM IST

Ajit Pawar on Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा हा काँग्रेसचा उपक्रम आहे - अजित पवार

भारत जोडो यात्रा हा काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. तो यूपीएचा कार्यक्रम नाही. त्यामुळं इतर पक्षांना विचारून त्यांनी काही करण्याची गरज  नाही. पण, ही एक मोठी यात्रा आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.

Mon, 12 Sep 202208:09 AM IST

जनावरांच्या लम्पी रोगाच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी. तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहिम राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ देण्यात आला आहे. 

Mon, 12 Sep 202207:44 AM IST

Sonali Phogat: सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे दिली जाणार

टिकटॉक स्टार व भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडं देण्याचा निर्णय गोवा सरकारनं घेतला आहे. फोगाट यांच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आम्ही तशी विनंती करणार आहोत, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

Mon, 12 Sep 202206:46 AM IST

Raj Thackeray: गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल राज ठाकरे यांनी मानले पोलीस व प्रशासनाचे आभार

करोनानंतर राज्यात प्रथमच गणेशोत्सव अतिशय उत्साहात व कोणतंही गालबोट न लागता पार पडला. त्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट करून महाराष्ट्र पोलीस व राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांचे जाहीर आभार मानले आहेत.

Mon, 12 Sep 202206:23 AM IST

Chandrashekhar Bawankule: शिंदे गटाच्या उमेदवाराबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे मोठं विधान

भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुका शिंदे गटाच्या सोबत लढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी निवडणुकांमध्ये जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची असेल, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते धुळ्यात बोलत होते.

Mon, 12 Sep 202204:50 AM IST

Gyanvapi mosque dispute : ज्ञानवापी विवादावर आज होणार फैसला; वाराणसीत कलम १४४ लागू

Gyanvapi mosque news : ज्ञानव्यापी मस्जिदमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा करत पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी काही लोकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं प्रशासनानं संपूर्ण वाराणसीत कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Mon, 12 Sep 202204:57 AM IST

Coronavirus: देशभरात गेल्या २४ तासांत ५,२२१ करोना रुग्णांची नोंद

मागील २४ देशाच्या विविध भागांत ५,२२१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ५,९७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४७,१७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोना संसर्गाचा दर २.८२ टक्के आहे.

Mon, 12 Sep 202204:22 AM IST

Rain updates : राज्यात आज सर्वदूर पावसाचा इशारा, या भागांत ऑरेंज अलर्ट

Maharashtra rain updates : ओडिशाच्या समद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच आता मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Mon, 12 Sep 202204:42 AM IST

Pakistani drone on border: भारतीय सीमेवर दिसला पाकिस्तानी ड्रोन

भारत-पाकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गुरुदासपूर इथं आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पाकिस्तानी ड्रोन संशयास्पदरित्या उडताना दिसला. भारतीय जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार करताच हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजून निघून गेले. या घटनेनंतर पोलीस व बीएसएफ जवानांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली आहे.

Mon, 12 Sep 202204:42 AM IST

Share Market: शेअर बाजार उत्साहाच्या लाटेवर; सेन्सेक्सनं ओलांडला ६० हजारांचा टप्पा

शेअर बाजारात सध्या सकारात्मक वातावरण दिसत असून सेन्सेक्समध्ये ३६५ अंकांची वाढ झाली आहे. त्यामुळं सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी देखील ११० अंकांनी वधारला आहे.