मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 12 July 2022 Live Updates Marathi Breaking News

Live Blog

Marathi News 12 July 2022 Live: माजी आमदार शरद पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Daily News Updates

Tue, 12 Jul 202202:30 PM IST

Pune rain update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवणार 

खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून रात्री ८.०० वाजता १३ हजार १४२ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी-जिल्हा प्रशासनाने  आवाहन केले आहे. 

<p>खडकवासला धरण&nbsp;</p>
खडकवासला धरण&nbsp;

Tue, 12 Jul 202201:05 PM IST

Pune Rain Update इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील ४८ तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

<p>आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्याखाली गेलेल्या पूल&nbsp;</p>
आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्याखाली गेलेल्या पूल&nbsp;

Tue, 12 Jul 202209:31 AM IST

Shiv Sena: माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश.

धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रा. शरद पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं.

Tue, 12 Jul 202208:53 AM IST

Pankaja Munde on OBC Reservation: निवडणूक आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही तडजोड होऊ नये - पंकजा मुंडे

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. मात्र, राज्य सरकारनं याबाबत ठाम भूमिका घेतली पाहिजे. याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ नये. निवडणुका पुढं ढकलाव्या, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

Tue, 12 Jul 202208:50 AM IST

Pankaja Munde: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे याची पत्रकार परिषद सुरू

सध्या जाहीर झालेल्या निवडणुका घेणं आवश्यक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र, निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करणार आहे. जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या आणि पुढील निवडणुका आरक्षणासह झाल्या तर तो समान न्याय म्हणता येणार नाही - पंकजा मुंडे

Tue, 12 Jul 202207:35 AM IST

Sanjay Raut: द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही - संजय राऊत

खासदारांच्या आग्रहामुळं शिवसेनेकडून भाजपच्या राष्ट्रपतीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, त्याआधीच संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tue, 12 Jul 202207:39 AM IST

Congress Taunt PM Modi: चीनच्या दादागिरीवरून काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

चीनच्या दादागिरीवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. ‘चीनला डोळे वटारून दाखवणं सोडाच, पंतप्रधान मोदी हे चीनचं नावही घेत नाहीत. हे कधीपर्यंत चालणार?,’ असा प्रश्न लोंढे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

Tue, 12 Jul 202207:23 AM IST

NCP Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार मार्गदर्शन करणार

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरू आहे.

Tue, 12 Jul 202206:39 AM IST

Bhima Koregaon Case: कोरेगाव भीमा प्रकरणी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनास मुदतवाढ

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते व कवी डॉ. पी. वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयानं वाढवली आहे. राव यांना याआधी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात आला आहे. राव यांनी कायमच्या जामिनाची मागणी केली आहे. त्यावर १९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Tue, 12 Jul 202205:14 AM IST

Jayakwadi: संततधार पावसाचा परिणाम; नाथसागर जलाशयातील पाण्याच्या पातळीत वाढ

JayakWadi Dam Water Level : मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यानं जायकवाडी धरणातील पाणीपातळी किंचित वाढली आहे. याशिवाय गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं गंगापूर आणि दारणा धरणांतून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे.

<p>Dam Water Level</p>
Dam Water Level

Tue, 12 Jul 202204:13 AM IST

Pune Rain Update पावसामुळे पुण्यात दोन जिर्ण वाडे कोसळले; दोघे जखमी

पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजिनव विस्कळीत झाले आहे. मध्यरात्री पुण्यात ३८६ नाना पेठ येथे मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोन जण जखमी तर अन्य दोघांची (महिला व पुरुष) दलाचे जवान पोहोचताच सुखरुप सुटका करण्यात आली. तर सोमवार पेठेतील बोळे वाडा येथे पहिल्या मजल्यावरील घराचा काही भाग कोसळला असून जखमी वा जिवितहानी नाही. शहारात सोमवारी झाडे कोसळण्याच्या १७ घटना घडल्या.

<p>Pune wada collapse&nbsp;</p>
Pune wada collapse&nbsp;

Tue, 12 Jul 202204:07 AM IST

केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला

केरळमध्ये कुन्नूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाला आहे. बॉम्ब हल्ला कुणी केला याबाबत माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्यामुळे कार्यालयाचं नुकसान झालं असून कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

Tue, 12 Jul 202202:46 AM IST

Maharashtra Politics: शिंदे गटातील आणखी एका बंडखोर आमदाराला सेनेचा दणका

शिवसेनेनं आणखी एका बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदार रविंद्र फाटक यांची पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे.

Tue, 12 Jul 202202:05 AM IST

Maharashtra Rain: राज्यातील ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यातील ७ जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि गडचिरोलीचा समावेश आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्यातील काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे