NEET Paper Leak Case : नीट पेपरफूटी प्रकरणी फरार शिक्षकाला माढ्यातून अटक! पत्नी मनोरुग्ण असल्याचं कारण देत केली बदली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NEET Paper Leak Case : नीट पेपरफूटी प्रकरणी फरार शिक्षकाला माढ्यातून अटक! पत्नी मनोरुग्ण असल्याचं कारण देत केली बदली

NEET Paper Leak Case : नीट पेपरफूटी प्रकरणी फरार शिक्षकाला माढ्यातून अटक! पत्नी मनोरुग्ण असल्याचं कारण देत केली बदली

Published Jun 25, 2024 01:08 PM IST

NEET Paper Leak Case : देशपातळीवर गाजलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी फरार शिक्षकाला माढा येथून अटक केली आहे. नांदेड एटीएस विभागाने जलीलखाँ उमरखान पठाण याला या पूर्वी अटक केली आहे. आणखी एक शिक्षक फरार आहे.

नीट पेपरफूटी प्रकरणी फरार शिक्षकाला माढ्यातून अटक! पत्नी मनोरुग्ण असल्याचं कारण देत केली बदली
नीट पेपरफूटी प्रकरणी फरार शिक्षकाला माढ्यातून अटक! पत्नी मनोरुग्ण असल्याचं कारण देत केली बदली

NEET Paper Leak Case: वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (NEET) पेपर फुटल्या प्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोज नवे नवे खुलासे पुढे येत आहेत. अशातच या पेपर फूटी प्रकरणी बिहार कनेक्शन सोबतच राज्याचेही कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे. नांदेड एटीएस पथकाने शनिवारी लातूर येथे दोन ठिकाणी छापेमारी केली असून या पेपरफूटी प्रकरणी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील एका जलीलखाँ उमरखान या शिक्षकाला अटक करण्यात आली होती. तर संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. त्याला चौकशी करून सोडल्यावर तो फरार झाला होता. संजय जाधवला माढा येथून अटक करण्यात आली आहे.

नांदेड एटीएस पथकाला लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव व त्याचा मित्र उपशिक्षक जलीलखा उमरखान पठाण हे दोघे पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी एटीएसने शुक्रवारी रात्री दोघांना अटक केली होती. तर आणखी काही जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

काही दिवसांनपूर्वी झालेल्या शिक्षक बदलीमध्ये संजय जाधव याने त्याने त्याची पत्नी मनोरुग्ण असल्याचे दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतली होती. दोघेही लातूर येथील जिल्हा परीक्षेच्या शाळेत काम करत होते. संजय जाधव हा १५ जून पासून जिल्हा परिषदेच्या गैरहजर होता. संजय जाधव याने २६ जून २०२३ पासून माढा तालुक्यातील टाकळी प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून काम सुरू केले. त्या पूर्वी तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम करत होता. तर २ मे २०२३ रोजी तो टाकळी येथे रुजू झाला होता.

शिक्षक संजय जाधव हा माढा येथे असला तरी तो लातूरमध्ये क्लास घेत होता. या ठिकाणी तो आणि त्याचा मित्र नीट परीक्षेत पास होण्यासाठी मुलांकडून पैसे घेत होते. नीट परीक्षेत गुणवाढवून देण्यासाठी दिल्लीतील गंगाधर नामक व्यक्तीशी ते संपर्कात होते. उमरगा आयटीआयतील इरण्णा कृष्णाजी कोनगलवार (देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागून घेत होता. संजय तुकाराम जाधव याला अटक करण्यात आल्याने या प्रकारातील अनेक धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर