मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Lightning: नाशिकमध्ये अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Gadchiroli Lightning News Today
Gadchiroli Lightning News Today (HT)

Nashik Lightning: नाशिकमध्ये अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

22 March 2023, 14:33 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Nashik Lighting: नाशिकच्या सुरगाणा जिल्ह्यात अंगावर वीज कोसळून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Nashik Shocking: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, अनेक जणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. यातच नाशिक येथील सुरगाणा तालुक्यात आणखी एका व्यक्तीचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, सावळीराम भोये असे अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. सावळीराम हे रविवारी (१९ मार्च २०२३) शेतात गेले होते. त्यानंतर दुपारी पावणे पाचच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे सावळीराम हे शेतातील अंब्याच्या झाडाखाली थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

सावळीराम हे रविवारी दुपारी घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशीर झाल्यानंतरही ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते कुठेच दिसले नाहीत. सावळीराम यांना भजनाच छंद असल्याचे ते भजनात गेले असावेत असे घरच्यांना वाटले. दुसऱ्या दिवशीही सावळेराम हे घरी न परतल्याने घरच्यांना त्यांची चिंता होऊ लागली. यामुळे त्यांनी शेतात जाऊन सावळेराम यांचा शोध घेतला. तेव्हा त्यांचा मृतदेह शेतातील अंब्याच्या झाडाखाली आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर नाईवाईकांनी सावळीराम भोये यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या दुर्दैवी घटनेमुळे सराड गावावर शोककळा पसरली आहे.

विभाग