Nagpur: पाहुणी म्हणून आलेल्या पुतणीच्या मैत्रिणीवर बलात्कार; बाळाच्या जन्मानंतर धक्कादायक प्रकार उघड
Nagpur Man Rapes Nephews friend: नागपुरात एका व्यक्तीने पुतणीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Ramtek Rape News: नागपुरातील रामटेक येथे पुतणीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या पुतणीने पीडिताला कार्तिक पौर्णिमेला गावी येण्याचे निमंत्रण दिले. मैत्रिणीच्या गावी गेल्यानंतर पीडिताची आरोपीच्या घरी राहण्याची सोय करण्यात आली. पाहुणी म्हणून आलेल्या या तरुणीवर आरोपीने वारंवार बलात्कार केला. तरुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश आहाके असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा विवाहित आहे. पीडित मुलगी तुमसर तालुक्यातील रहिवाशी असून नागपुरात पदवीचे शिक्षण घेते. महाविद्यालयात पीडिताची आरोपीच्या पुतणीशी ओळख झाली. कौटुंबिक संबंध असल्याने आरोपीच्या पुतणीने नोव्हेबर २०२२ मध्ये पीडिताला कार्तिक पौर्णिमेला गावी बोलावून घेतले. घरी पाहुणी म्हणून आलेल्या पीडितेची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आरोपीच्या घरी करण्यात आली.
पीडिता दिसायला सुंदर असल्याने आरोपीची वाईट नजर तिच्यावर गेली. घरात एकटी असताना ती त्याच्याशी अश्लील चाळे करायचा. दरम्यान, आरोपी हा पीडिता झोपलेल्या खोलीत घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडिता ७ दिवस मुक्कामी होती. या कालावधीत आरोपीने तिच्यावर ५ वेळा बलात्कार केला.
पीडिता पाच महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार तिच्या आई आणि बहिणीच्या लक्षात आला. पीडिताच्या आईने तिला गर्भपात करण्यास सांगितले. परंतु, तिने नकार दिला. यानंतर पीडिताच्या आईने तिला पुण्यात राहणाऱ्या बहिणीकडे नेले. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी तिची प्रसुती झाली. मात्र, बाळाला वडिलाचे नाव मिळणार नाही, ही बाब तिच्या लक्षात येताच तिने रामटेक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विभाग