Mumbai: मुंबईतील कुर्ला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारला अपघात झाला. या अपघात समीर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात नियमित तपासणी करून परतत असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई नियमित तपासणी करण्यासाठी कुर्ल्यातील एका रुग्णालयात गेले होते. तपासणी करून घरी परतत असताना अशी घटना घडली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान हे कारमध्ये चढत असताना कारचालकाने चुकून अॅक्सिलेटर दाबले आणि कार भिंतीवर आदळली. या घटनेत समीर खान यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.