Abu Azmi: सपा नेते अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abu Azmi: सपा नेते अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट

Abu Azmi: सपा नेते अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट

Published Jan 22, 2023 06:50 AM IST

Abu Azmi Threat Call: समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Abu Azmi
Abu Azmi

Abu Azmi gets death threat over Aurangazeb remark: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अबू आझमीच्या खासगी सचिवाच्या नंबरवर धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०६(२) आणि ५०४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मुघल सम्राट औरंगजेबाबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण आहे.औरंगजेबाबाबत महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाजेबाबाबत वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अलर्टमोडमध्ये असून धमकीचा कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.

जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे रविवारी (१५ जानेवारी) दादा हयात कलंदर साहेबांची चंदन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात काही तरूण औरंगाजेबाचा फोटो घेऊन नाचताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओला हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला होता.

औरंगजेबाबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झालाय. राष्ट्रवादीचे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हिंदूविरोधी नसल्याचे म्हटले होते. जर तो हिंदुद्रोही असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे, ज्या ठिकाणी त्यांना बाधले होते तिथे उपस्थित असलेल्यांनी विष्णूच्या मंदिराचाही नाश केला असता पण त्याने तसे केले नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर