"परवडत नसेल तर २-३ महिने कांदा खाऊ नका, काही बिघडत नाही" दादा भुसेंचे अजब विधान
Onion rate : कांद्याचे दर परवडत नसतील तर कांदा खाऊ नका, २-३ महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडणार नाही, असे अजब विधान मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
टोमॅटोनंतर आता कांद्याने राज्यातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरूवात केली आहे. मात्र केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्या आक्रमक झाले असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकार- केंद्राशी चर्चा करून याबाबत तोडगा काढला जाईल असे शिंदे सरकारमधील मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्याचबरोबर भुसे यांनी कांदा महागाईबाबत तक्रार करणाऱ्यांना एक अजब सल्ला दिला. कांद्याचे दर परवडत नसतील तर कांदा खाऊ नका, २-३ महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडणार नाही, असे अजब विधान त्यांनी केले आहे.
भूसे म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेईल. कांदा जास्त दिवस टिकवता येत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करुन टिकवण्यासाठीचा मोठा खर्च येतो. त्यामुळे उद्या कांदा २५ रुपयावर गेला तर, ज्याला परवडत नाही, त्याने २ ते ३ महिने कांदा खाल्ला नाही तर कुठे बिघडतंय, असे म्हणत दादा भुसे यांनी काद्यावरील निर्यात बंदीच्या निर्णायावर भाष्य केलं आहे.
नाशिक जिल्हा येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
विभाग