मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर पैसे कधी मिळणार? वाचा

Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर पैसे कधी मिळणार? वाचा

Jul 10, 2024 01:50 PM IST

Majhi ladki bahin yojana Document: माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, जाणून घ्या.

माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती
माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

Majhi Ladki Bahin Yojana Form: महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनानेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. राज्यातील बहुतेक महिलांनी अर्ज भरायला सुरुवात केली. पण अर्ज भरल्यानंतर खात्यात पैसे कधी जमा होतील? हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील, अशी माहिती अजित पवारांनी दिली. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै २०२४ होती. मात्र, त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरला आहे. यातील पात्र लाभार्थ्यांची यादी १६ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ रोजी लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. १५ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होईल, असा अंदाज आहे. सप्टेंबरपासून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला महिलेच्या खात्यात १५०० जमा होतील.

पात्रता

- २१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.

- वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.

- या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.

- इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.

- सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.

- सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड (Aadhar Card)

२) जात प्रमाणपत्र (Cast Certificate)

३) मूळ निवासी प्रमाणपत्र (Domicile Cetificate)

४) रेशन कार्ड (Ration Card)

५) उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)

६) बँकेचे पासबूक (Bank Passbook)

८) मोबाईल क्रमांक (Mobile Number)

९) पासपोर्ट साईज फोटो (Passport size Photo)

१०) माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म (Majhi ladki bahin yojana Application Form)

WhatsApp channel
विभाग