मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election: महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; तुमच्या येथे मतदान कधी? सविस्तर माहिती

Lok Sabha Election: महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; तुमच्या येथे मतदान कधी? सविस्तर माहिती

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 16, 2024 04:59 PM IST

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Dates: महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कुठे मतदान होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024

Lok Sabha Election 2024 Schedule: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशातील ५४३ लोकसभा जागांसाठी ७ टप्प्यात मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे मतदान होणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे, अशी महिती निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी दिली.

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कुठे मतदान?

पहिला टप्पा (१९ एप्रिल २०२४): रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

दुसरा टप्पा (२६ एप्रिल २०२४): बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.

तिसरा टप्पा (७ मे २०२४): रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा (१३ मे २०२४): नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा (२० मे २०२४): धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही आज घोषित केल्या.

IPL_Entry_Point