मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं? जाणून घ्या लेटेस्ट आकडे!

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं? जाणून घ्या लेटेस्ट आकडे!

May 27, 2024 06:00 PM IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? हे जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान झाले.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान झाले. (HT)

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली. राज्यात १९ मे २०२४ रोजी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाले. आता निवडणूक आयोगाने राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर कुठे आणि किती मतदान झाले याची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. निवडणुकीचा डेटा कोणीही बदलू शकत नाही, असे निवडणूक एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंगात किती मतदान?

अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के.

नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल

महाराष्ट्रात २०१९ मध्ये चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडली.ही निवडणूक यूपीए आणि एनडीएमध्ये लढली गेली. यूपीएमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती. एनडीएमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने अनुक्रमे २३ आणि १८ जागा जिंकल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने चार आणि काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला. याशिवाय, एआयएमआयएमने एक जागा जिंकली आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यावेळी राज्यात ६१.०२ टक्के मतदान झाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४