मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Health Department Exam : खुशखबर.. आरोग्य विभागात १० हजाराहून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा

Health Department Exam : खुशखबर.. आरोग्य विभागात १० हजाराहून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 21, 2022 07:53 PM IST

Health Department Recruitment : राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल १०,०२७ पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे.आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदि पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

आरोग्य विभागात १० हजाराहून अधिक पदांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजाराहून अधिक पदांसाठी भरती

Health Department Exam : शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच राज्यात ७५ हजार सरकारी पदांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल १०,०२७ पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे.आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदि पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत घोटाळा झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणामुळे ही भरती प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलं होते.

आता शिंदे-फडणवीस सरकारने आरोग्य विभागाची भरतीची घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की, राज्यात आरोग्य विभागाच्या भरतीकडे दुर्लक्ष झालं होतं. आता आम्ही १०, ०२७ जागांची भरती केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेची जाहिरात १ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान प्रसिद्ध होईल. २५ ते ३० जानेवारी दरम्यान अर्ज करता येतील. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होईल तर २५ आणि २६ मार्च रोजी परीक्षा होईल. २७ एप्रिलपर्यंत उमेदवार निवड होईल. संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी ही परीक्षा होईल.

मार्च २०१९ मध्ये अर्ज भरलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वय निघून गेले आहे, त्यांना या परीक्षेत सूट देण्यात येणार आहे. यापूर्वी एकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी अर्ज केले होते. यावेळी प्रत्येक उमेदवाराला एकच अर्ज करावा लागणार आहे. तसेच याआधी परीक्षा फॉर्म भरलेल्यांना पैसे परत मिळणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या