राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!

राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!

Jan 18, 2025 09:56 PM IST

Maharashtra govt announces Guardian Minister List: महायुती सरकारने नुकतीच राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात आली? वाचा!

राज्याच्या पालकमंत्री यादी जाहीर
राज्याच्या पालकमंत्री यादी जाहीर

Maharashtra Guardian Minister List: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण हत्याप्रकरणामुळे चर्चेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना यादीतून वगळण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद संभाळतील. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबईचे पालकमंत्री असतील.

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी २०२५) राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे?

१) गडचिरोली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल

२) ठाणे, मुंबई शहर- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३ पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार

४) नागपूर, अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे

५) अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील

६) नाशिक- गिरीश महाजन

७) वाशिम- हसन मुश्रीफ

८) सांगली- चंद्रकांत पाटील

९) जळगाव- गुलाबराव पाटील

१०) यवतमाळ- संजय राठोड

११) मुंबई उपनगर- आशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा

१२) रत्नागिरी- उदय सामंत

१३) धुळे- जयकुमार रावल

१४) जालना- पंकजा मुंडे

१५) नांदेड- अतुल सावे

१६) चंद्रपूर- अशोक ऊईके

१७) सातारा- शंभुराजे देसाई

१८) रायगड- अदिती तटकरे

१९) सिंधुदुर्ग- नितेश राणे

२०) लातूर- शिवेंद्रसिंहराजे भोसले

२१) नंदुरबार- माणिकराव कोकाटे

२२) सोलापूर- जयकुमार गोरे

२३) हिंगोली- नरहरी झिरवाळ

२४) भंडारा- संजय सावकारे

२५) छत्रपती संभाजीनगर- संजय शिरसाट

२६) धाराशीव- प्रताप सरनाईक

२७) बुलढाणा- मकरंद जाधव

२८) अकोला- आकाश फुंडकर

२९) गोंदिया- बाबासाहेब पाटील

३०) कोल्हापूर- प्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ

३१) वर्धा- पंकज भोयर

३२) परभणी- मेघना बोर्डीकर

३३) पालघर- गणेश नाईक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय संजय कराड यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई झाली. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला. यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आले. तर,अजित पवार यांच्यावर पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या