मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Health Scheme : सीमाभागातील मराठी बांधवानांही घेता येणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

Health Scheme : सीमाभागातील मराठी बांधवानांही घेता येणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2024 04:44 PM IST

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना आता कर्नाटकातील सीमाभागात लागू करण्यात आली आहे. सामीभागातील जवळपास ८६४ गावातील लोक या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Health Scheme
Health Scheme

महाराष्ट्र सरकारने सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शेजारचे राज्य कर्नाटकातील ८६४ गावांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचे आदेश सोमवारी जारी केले आहे. याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ती योजना लागू करण्याचे आदेश (जीआर) सोमवारी जारी केले. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकासाठी राबवण्यात येणाऱ्या आरोग्य विमा योजनेसाठी दरवर्षी ५ कोटी रुपयांपर्यंतची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारने आरोग्य विमा योजनेसाठी अर्ज भरण्यास बेळगाव शहरात पाच केंद्र सुरू केले आहेत.

महाराष्ट्र सरकारच्याआदेशात म्हटले आहे की, बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बीदरमधील ८६४ गावात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली जाणार आहे. यासाठी पात्र कुटूंबांना दरवर्षी पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रवक्ते विकास कलघटगी यांनी सांगितले की, बेळगाव, बिदर, कलबुर्गी आणि कारवारसह कर्नाटकातील ८६४ ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून विमा अर्ज वितरण केंद्रे लवकरच सुरू केली जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेसाठी ऑनलाइन देखील अर्ज करता येणार आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक देखील सुरू केला जाणार आहे.

महाराष्ट्राने आरोग्य विमा योजनेला ‘महात्मा फुले आरोग्य योजना’ असे नाव दिले आहे. सरकारने यापूर्वी अर्थसंकल्पात यासाठी १८१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. लाभार्थी अर्जदार कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडक रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात. बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, सध्या कर्नाटकात बेळगावमधील पाच रुग्णालयांसह १२ हून अधिक रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत. यामध्ये काही मल्टी स्पेशालिटी रुग्णालयेही असतील.

महात्मा जोतिराव फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री या दोन्ही जनआरोग्य योजनांच्या एकत्रिकरणाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या आरोग्य योजनेअंतर्गत आता १३५६ आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

महाराष्ट्राने कर्नाटकातील ८६४ गावांवर दावा केला असून हा मुद्दा २००४ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

WhatsApp channel