मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Teachers Recruitment: महाराष्ट्रात मोठी शिक्षक भरती; सरकारची २१ हजार ७६८ रिक्त पदांसाठी जाहिरात

Teachers Recruitment: महाराष्ट्रात मोठी शिक्षक भरती; सरकारची २१ हजार ७६८ रिक्त पदांसाठी जाहिरात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2024 02:46 PM IST

Maharashtra Teacher Recruitment 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यातील मोठी शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली.

Teachers Recruitment
Teachers Recruitment

Maharashtra Teacher Govt Advertises: दीर्घकाळानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये मोठी शिक्षक भरती जाहीर केली. या भरतीअंतर्गत एकूण २१ हजार ७६८ रिक्त पदे भरली जाणार आहे. राज्यातील शाळांमध्ये एका दशकातील ही सर्वात मोठी भरती आहे.

भरतीच्या पहिल्या टप्प्यातील रिक्त पदांच्या यादीमध्ये जिल्हा प्रशासन, नगरपरिषद आणि महानगरपालिका संचालित सरकारी शाळांमधील १५ हजार ९५० पदे आणि १ हजार १२३ खाजगी अनुदानित शाळांमधील ५ हजार ७२८ पदांचा समावेश आहे. यापूर्वी सरकारने ३० हजार शिक्षक भरतीची घोषणा केली होती. परंतु, या भरतीमध्ये अनेक जागा 'आरक्षित' ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात सुमारे ६५ हजार रिक्त अध्यापन पदे आहेत, जी २०१२ पासून भरली गेली नाहीत. राज्याने अनेक संस्थांमध्ये शिक्षकांच्या जास्त संख्येमुळे शाळा भरती बंद केली होती. सरकारने २०१७ मध्ये सुमारे १२ हजार पदांसाठी केंद्रीकृत भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्यापैकी केवळ ६ हजार जागाच भरल्या गेल्या.

यापूर्वी राज्याने सरकारी शाळांमधील ८० टक्के रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. परंतु, आता त्यापैकी फक्त ७० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला. या जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण आयुक्त सुरज मांधरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

WhatsApp channel