मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खुशखबर.. सरकारी नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

खुशखबर.. सरकारी नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2023 10:41 PM IST

Government jobs age limit increased : कोरोनाकाळात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देत सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय
शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने कमाल वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याचं परिपत्रक जारी केले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढली आहे. कोरोना काळात दोन वर्षे वाया गेल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाकाळात सरकारी नोकरभरती ठप्प होती. त्यामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देत सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवली आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध करून सरळ सेवेमार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आल्याचे म्हटलं आहे.

सरकारच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या विविध विभागात ७५ हजार नोकर भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय खूप महत्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा यामुळे ३८ वरून ४० तर मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ ऐवजी ४५ वर्षे होईल.

 

वयोमर्यादेतील ही सूट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील. म्हणजे या काळात प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी हा निर्णय लागू राहील. त्यानंतर पूर्वीची वयोमर्यादा राहील.

WhatsApp channel