Mukhyamantr Annapurna yojana : राज्य सरकारने महिलांना आणखी एक खुशखबर देत मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि विद्यावेतन योजनेनंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थी महिलांना मिळणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेतून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्याा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल.
एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाही.
१४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना याचा लाभ मिळेल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला योजनेसाठी पात्र असतील
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र असलेल्या ५२.१६ लाख महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण करून मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाइट राज्य सरकारने अद्याप अधिसूचित केलेली नाही. सर्व पात्र अर्जदार अधिकृत वेबसाइट किंवा शासन निर्णय पाहून योजनेची माहिती घेऊ शकतात आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाइट जाहीर केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकतात. यासाठी लाभार्थ्यांकडे आधार, पॅन कार्ड, गॅस जोडणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, उज्जवला व लाडकी बहीण योजना नोंदणी आदि कागदपत्रे असावीत.
संबंधित बातम्या