CM of Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आधीच भाजपासमोर तलवार केली म्यान?, ‘या’ तीन गोष्टींनी मिळाले होते संकेत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM of Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आधीच भाजपासमोर तलवार केली म्यान?, ‘या’ तीन गोष्टींनी मिळाले होते संकेत

CM of Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आधीच भाजपासमोर तलवार केली म्यान?, ‘या’ तीन गोष्टींनी मिळाले होते संकेत

Nov 27, 2024 06:11 PM IST

Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या १३२ आमदारांसमोर आपल्या ५७ आकड्यासह शरणागती स्वीकारली आहे. महाराष्ट्रात सत्तेसाठी जादुई आकडा १४५ असून भाजप केवळ १३ जागा दूर होता.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Hindustan Times)

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापन करण्यात व मुख्यमंत्री पदासाठी जे निर्णय घेतील, तो प्रत्येक निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. भाजपकडून कोणालाही मुख्यमंत्री केले जाईल, ते त्यांना मान्य असेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या १३२ आमदारांसमोर आपल्या ५७ आमदारसंख्येसह शरणागती पत्करली.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी जादुई आकडा १४५ असून भाजप केवळ १३ जागा दूर आहे. याशिवाय अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेपासून स्वत:ला दूर ठेवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

फडणवीसांसाठी मार्ग सोपा असून एकनाथ शिंदे यांची जिद्द संबंध बिघडवण्यापलीकडे काहीच करू शकणार नाही, हे स्पष्ट झाले होते. अशा तऱ्हेने एकनाथ शिंदे यांनी वेळीच या रस्सीखेचातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे सर्व अचानक घडलेले नसून हा करार बहुधा पडद्याआड झाला असावा. असे संकेतही एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी दिले. सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीसाठी आपल्या निवासस्थानासमोर शक्तीप्रदर्शन म करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

त्याचवेळी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनीही ते ट्विट डिलीट केले, ज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय मुख्यमंत्रीपदासाठी भाजप सोडून हिंदुत्वाच्या विरोधकांसोबत जाण्यासाठी आम्ही उद्धव सेनेसारखे स्वार्थी नाही, असे त्यांचे अनेक नेते सांगू लागले. अशा प्रकारे या तिन्ही घटना अशा होत्या की, एकनाथ शिंदे गटाची वृत्ती नरमल्याचे दिसून येत होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे मानले जात आहे. याशिवाय केंद्र सरकारमधील काही खातीही शिवसेनेकडे येऊ शकतात.

केंद्रातच जाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका केली स्पष्ट -

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही मला दिल्लीला का पाठवू इच्छिता? खुद्द एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायला आवडणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याऐवजी त्यांना राज्यात उपमुख्यमंत्री होण्याचा आनंद होईल. कारण त्यांचा पक्ष राज्यपातळीवर असून ते केंद्रात गेले तर कार्यकर्त्यांशी व्यवहार करणे सोपे जाणार नाही. राज्यात ते थेट सत्तेत राहिले तर ते जोडलेले राहतील आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे सोपे जाईल.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर