मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2022 09:43 PM IST

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या गटांमध्ये ३३ लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यात हबीब भंडारे, रमजान मुल्ला, शरद बाविस्कर, दीपा देशमुख आणि अन्य लेखकांचा समावेश आहे.

उत्कृष्ट वाङ्यम निर्मितीसाठी जाहीर झालेले पुरस्कार साहित्य प्रकार, पुरस्काराचे नाव, पुरस्कार प्राप्त लेखक, कंसात पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम या प्रमाणे

प्रौढ वाङमय (काव्य) -कवी केशवसुत पुरस्कार: हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त), ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) १ लाख रुपये. प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका)- विजय तेंडूलकर पुरस्कार : शिफारस नाही;  प्रौढ वाङमय (कांदबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशांत बागड (नवल) १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : श्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं..) , ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिंग), ५० हजार रुपये. प्रौढ वाङमय (ललितगद्य) (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.निलिमा गुंडी (आठवा सूर), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई शिंदे पुरस्कार : वीणा सामंत (साठा उत्तराची कहाणी), ५० हजार रुपये;

प्रौढ वाङमय (विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून), १ लाख रुपये; प्रौढ वाङमय (चरित्र)- न.चिं.केळकर पुरस्कार: वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी), १ लाख रुपये;     प्रौढ वाङमय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा), १ लाख रुपये;  प्रौढ वाङमय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार: दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ), १ लाख रुपये;  प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : प्रा.ड़. प्रकाश शेवाळे (अनुष्टभ नियतकालिकाचे वाङमयीन योगदान ), ५० हजार रुपये;  प्रौढ वाङमय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा (शोध नेहरू-गांधी पर्वाचा ), १ लाख रुपये;

IPL_Entry_Point