Govt Holidays 2025 : महायुती सरकार लाडक्या बहिणींवर चांगलेच मेहरबान असल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. याचा फायदा निवडणुकीत महायुतीला झाला. आता सरकारस्थापन होताच आणखी एक गिफ्ट महायुतीसरकारने लाडक्या बहिणींना दिले आहे. या वर्षीची शासकीय सुट्यांची यादी जाहिर करण्यात आली असून यात भाऊबीजेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
डिसेंबर महिना सुरु झाल्यावर नव्या वर्षातील शासकीय सुट्या सरकारतर्फे जाहीर करण्यात येतात. २०२५ च्या शासकीय सुट्यांची यादी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी राज्य सरकारने काही शासकीय सुट्यांमध्ये वाढ केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या २०२५ मधील सुट्यांच्या यादीत भाऊबीजेची सुट्टी दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी शासकीय सुट्ट्यांची संख्या ही २५ वर गेली आहे.
राज्य सरकारनं गेल्या वर्षी जाहीर केलेल्या शासकीय सुट्यांच्या यादीत भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र, या वर्षी खास शासकीय पत्रक काढून २०२५ पासून भाऊबीजेची सुट्टी या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये देखील विशेष उल्लेख करत अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे.
१. प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी २०२५
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती -१९ फेब्रुवारी २०२५
३. महाशिवरात्री- २६ फेब्रुवारी
४. होळी (दुसरा दिवस)-१४ मार्च
५. गुढी पाडवा- ३० मार्च
६. रमझान ईद- ३१ मार्च
७. रामनवमी - ६ एप्रिल
८. महावीर जन्म कल्याणक - १० एप्रिल
९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - १४ एप्रिल
१०. गुड फ्रायडे -१८ एप्रिल
११. महाराष्ट्र दिन -१ मे
१२. बुद्ध पौर्णिमा -१२ मे
१३. बकरी ईद- ७ जून
१४. मोहरम- ०६ जुलै
१५. स्वातंत्र्य दिन -१५ ऑगस्ट
१६. पारशी नववर्ष दिन -१५ ऑगस्ट
१७. गणेश चतुर्थी - २७ ऑगस्ट
१८. ईद ए मिलाद- ५ सप्टेंबर
१९. महात्मा गांधी जयंती- ०२ ऑक्टोबर
२०. दसरा - ०२ ऑक्टोबर
२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) - २१ ऑक्टोबर
२२. दिवाळी (बलिप्रतिपदा)- २२ ऑक्टोबर
२३. भाऊबीज- २३ ऑक्टोबर
२४. गुरुनानक जयंती -५ नोव्हेंबर
२५ .ख्रिसमस- २५ डिसेंबर
संबंधित बातम्या