Maharashtra Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता

Maharashtra Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता

Jun 28, 2024 08:17 AM IST

Maharashtra State Budget 2024 : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात सरकार विविध घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील.

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता
राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता

Maharashtra State Budget 2024 : राज्य सरकार आज शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. गुरुवारी राज्याच्या आर्थिक पाहणीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला होता. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेतील झालेल्या पराभवामुळे महायुती सरकार शेतकरी, महिला, तरुणांना आकर्षित करण्यासाठी  या अर्थसंकल्पांत भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद

आज विधीमंडळात अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पाचे वाचन करतील. या अर्थसंकल्पात राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोठ्या तरतुदी करण्याची शक्यता आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नव्याने लागू करण्याची शक्यता आहे. तर मराठा व ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजाला खुश ठेवण्यासाठी देखील सरकार तरतूद करण्याची शक्यता आहे.

पेट्रोल डिझेलचा दारांकडे लक्ष ?

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे अशी मागणी केली जात आहे. सध्या निवडणुका जवळ आल्याने सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी सरकार पेट्रोल यांनी डिझेलच्या दरकपाती संदर्भात काय निर्णय घेणार या कडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

बेरोजगार तरुणांना काय मिळणार ?

राज्य सरकार अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी करण्याची शक्यता आहे. यात तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यात महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राबवून गरीब महिलांना १२०० ते १५०० रुपयांचा भत्ता देण्याची शक्यता आहे. तर बेरोजगार तरुणांनाही दरमहा ५ हजार रुपयांचा भत्ता जाहीर होण्याची शक्यता आहे. हे निर्णय झाल्यास राज्यातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. त्या दृष्टीने अर्थसंकल्पांत तरतुदी होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने हा अर्थसंकल्प शेतकरी, राज्यातील तरुण आणि महिला यांच्या विकासाच्या दृष्टीने मांडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज होणाऱ्या अर्थसंकल्पातून कोणते घटक खुश तर कोणते घटक नाराज होणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर