dahi handi : गोविंदांना १० लाख रुपयांचं विमा संरक्षण! २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन-maharashtra government announces rs 10 lakh insurance cover for govindas during dahi handi festival ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  dahi handi : गोविंदांना १० लाख रुपयांचं विमा संरक्षण! २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

dahi handi : गोविंदांना १० लाख रुपयांचं विमा संरक्षण! २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

Aug 14, 2024 09:42 AM IST

Dahi handi festivhal : राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवात तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतो. राज्य सरकारने गोंविंदासाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू केले असून यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गोविंदांना १० लाख रुपयांचं विमा संरक्षण! २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं राज्य सरकारचं आवाहन
गोविंदांना १० लाख रुपयांचं विमा संरक्षण! २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं राज्य सरकारचं आवाहन (HT photo/AnshumanPoyrekar.)

Dahi handi festivhal : राज्य सरकारने दहीहंडी उत्सवापूर्वी गोविंदांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गोविंदांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्यात आले असून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे तयार करतांना एखादी दुर्घटना किंवा दुर्घटना घडल्यास किंवा जखमी झालेल्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार असल्याचं राज्याच्या क्रीडा विभागाने जाहीर केलं आहे. या साठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने राज्यातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम सुरू केली आहे.

तब्बल ७५ हजार गोविंदांचा उतरवला जाणार विमा

सरकारी आदेशानुसार हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ७५ हजार गोविंदांचा विमा उतरवण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडीदरम्यान अपघातात गोविंदांचा एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास त्यांना ५ लाख तर दोन्ही हात, पाय किंवा डोळे गमावणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळू शकणार आहेत.

२४ ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज

दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. असे असतांनाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्यास सुरुवात केली आहे. या साठी गोविंदांना २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा १४ ऑगस्टपासून ते २८ ऑगस्ट पर्यंत ६ वाजेपर्यंत राहणार आहे. अर्ज करतांना मंडळाचे विनंती पत्र, अर्ज व सर्व गोविंदांची नावे, वय व मोबाईल क्रमांक नमूद करून स्कॅन करून gi.mrdga@gmail.com या ई – मेल आयडीवर पाठवावे असे आवाहंन देखील महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे.

२७ ऑगस्ट रोजी साजरा होणार दहीहंडी उत्सव

यंदा २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी देखील मोठ्या संख्येने या उत्सवात विविध वयोगटातील नागरिक सहभागी होणार आहे. विशिष्ट उंचीवर बांधलेली दही हांडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथक उंच मानवी मनोरे तयार करून ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात. या साठी मोठ बक्षीस देखील गोविंदांना दिलं जातं.

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी साजरी केली जाते. कृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यावर प्रामुख्याने दुसऱ्या दिवशी राज्यात हा सण साजरा केला जातो. दहीहंडी हा राज्यातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनशैलीचे स्मरण म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

विभाग