खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव

खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव

Updated Jul 28, 2024 01:52 PM IST

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांनी खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन कोणाला पाठवले होते, त्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे.

 अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस
अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस

Anil Deshmukh On Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र घेऊन कोणाला पाठवले? हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले. फडणवीस यांनी सांगलीतील मिरजे येथील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकाऱ्याला पाठवले होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.

अनिल देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना असे म्हणाले की, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयात आले आणि त्यांनी फडणवीस यांना त्यांच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. समित कदम हे पाच ते सहा वेळा फडणवीसांचा निरोप घेऊन माझ्या कार्यालयात आले. आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा त्यांनीच आणला होता. माझ्याकडे परस्परसंवादाचे व्हिडिओ फुटेज आहेत, योग्य वेळी लोकांसमोर आणेल.

याआधीच्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी दावा केला की, फडणवीस यांनी कदम यांच्यामार्फत फोनद्वारे संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी केल्या ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे येणार नाही, असे मला सांगण्यात आले. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र, मला आयुष्यभर तुरुंगात जावे लागले तरी मी खोटे आरोप करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मी झुकलो नाही आणि म्हणूनच मला ईडी आणि सीबीआयला सामोरे जावा लागले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी एप्रिल २०२१ मध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर शहरातील हॉटेल आणि बारमालकांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोटी शपथपत्रे दाखल करण्यासाठी दबाव आणला.तसेच ईडी आणि सीबीआयच्या तपासापासून मुक्ततेचे आश्वासन दिल्याचा अनिल देशमुखांनी दावा केला. मात्र, फडणवीसांनी या दाव्यांचे खंडन केले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी यांच्यावर दबाव आणला होता. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी भाजप दबावाचे डावपेच वापरत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. मात्र, संजय राऊतांनी केलेला आरोप फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावले. देशमुखांच्या स्वतःच्या पक्षाकडे त्यांच्या विरोधातील पुरावे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर