मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire: पुण्यातील वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग

Pune Fire: पुण्यातील वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 31, 2023 07:49 AM IST

Pune Fire: पुण्यातील वाघोली येथील एका गोदामाला बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

Pune Fire
Pune Fire

Pune Fire: पुण्यातील वाघोली परिसरातील पुणे-अहमदनगर रस्त्यावरील एका गोदामाला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने आग आटोक्यात आली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत लाखो रुपयांची उत्पादने जळून खाक झाली आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरात दुग्धजन्य पदार्थांचा साठा असलेल्या एका गोदामाला बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांच्या उत्पदनाचे नुकसान झाले. तसेच पिकअप टेम्पो जळून खाक झाल्याचे माहिती समोर आली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील वाघोली परिसरातील सजावट साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती.

IPL_Entry_Point

विभाग