Thane Fire News: ठाण्यातील देव कॉर्पोरा इमारतीला आग लागल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत ९ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
एएनआय वृत्त संस्थेने ठाणे महानगरपालिकेच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील देव कॉर्पोरा इमारतीला मध्यरात्री आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून आतापर्यंत ९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील महाराष्ट्रातील मोरिवली एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (१३ सप्टेंबर २०२४) गॅस गळतीची घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीत नियमित व्हेंटिंग ऑपरेशन दरम्यान ही घटना घडली. अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. ज्या भागात गॅस गळती झाल्याची नोंद झाली आहे, त्या भागात अनेक रासायनिक कारखाने आहेत. गॅस गळतीमुळे नागरिकांच्या घशात जळजळ आणि डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आली. मात्र, गॅस गळती कशामुळे झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही.