आठव्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्रीही… विधानसभेच्या निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आठव्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्रीही… विधानसभेच्या निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!

आठव्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्रीही… विधानसभेच्या निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!

Nov 22, 2024 05:07 PM IST

Maharashtra Elections Results 2024: महाराष्ट्रात कुणाची सत्ता स्थापन होणार, हे उद्या स्पष्ट होणार असून त्याआधीच पुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.

निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!
निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!

Ajit Pawar News: महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान झाले. तर, राज्यात कुणाची सत्ता येणार, हे उद्या म्हणजेच २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच पुण्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र, काही वेळानंतर हे पोस्टर हटवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील नेत्यांनी हे पोस्टर लावले होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. उद्या देशात महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. यापूर्वी अनेक एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत, ज्यात महाराष्ट्रात महायुती आणि झारखंडमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल, अंदाज व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, त्यानंतर महायुतीत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेले अजित पवार यांचे पुण्यात भावी मुख्यमंत्री असे पोस्ट झळकले.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. यासोबतच यूपीसह इतर ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही येणार आहेत. उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाते आणि नंतर मतमोजणी केली जाईल. दुपारपर्यंत राज्यातील चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे इंडिया अलायन्सच्या वतीने मुख्यमंत्रीपदावर आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. मात्र, यापूर्वी अनेकदा निवडणुका चुकीच्या ठरल्या आहेत, त्यामुळे देशाच्या नजरा निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत.

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल वृत्तवाहिन्या, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील. लाइव्ह हिंदुस्थानच्या वेबसाईटवर क्लिक करून पहिला आणि अचूक निकाल पाहता येणार आहे. मतमोजणीला सुरुवात होताच निकाल दिसेल. त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यांचे निकाल हिंदुस्थान टाइम्सच्या वेबसाईटवर पाहता येतील. त्याचबरोबर हिंदुस्थान टाइम्सच्या मराठीच्या यूट्यूब चॅनेलवरही निकाल वेगाने दाखवण्यात येणार आहे.

देशातील सर्व निवडणुकांप्रमाणेच महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही सकाळी ८. वाजल्यापासून दिसणार आहेत. उत्तर प्रदेशविधानसभा आणि पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला निवडणूक आयोग सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात करणार आहे. थोड्याच वेळात आकडे ही येऊ लागतील. मात्र, सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर ४५ मिनिटे किंवा तासाभरानंतर ईव्हीएममधून मिळालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. कोणत्या राज्यात कोणता पक्ष बाजी मारतो? हे पाहण्यासाठी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर