Maharashtra Elections2024 :महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून प्रारंभ झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई शहरातील या दहा मतदारसंघांमध्ये अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झाले आहे.मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत फरक आहे. सर्वाधिक मतदान वडाळा (४२.५१ टक्के) आणि मलबार हिल (४२.५५ टक्के) या मतदारसंघात झाले आहे.
याचवेळी आज दुपारी ३ वाजेपर्यंत माहिम मतदारसंघात ४५.५६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. शिवडीमध्ये ४१.७६ टक्के,भायखळ्यामध्ये ४०.२७ टक्के,आणि वरळीमध्ये ३९.११ टक्के मतदान झाले आहे. धारावी मतदारसंघात ३५.५३ टक्के,सायन-कोळीवाडा मतदारसंघात ३७.२६ टक्के,मुंबादेवीमध्ये ३६.९४ टक्के मतदान झाले आहेत. तर,कुलाबा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी असून, अवघी ३३.४४ टक्के नोंदवली गेली आहे.
मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या प्रतिसादात थोडा फरक दिसून येत असला तरी एकंदरीत,शहरवासीयांमध्ये मतदानाची चांगली उपस्थिती आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाच्या प्रक्रियेसाठी सशक्त तयारी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या असून,कोणत्याही अप्रिय घटनेच्या प्रतिबंधासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरातील बोरिवली विभागात ४५.३८ टक्के मतदान झाले आहे. तर, भांडुप पश्चिम विभागात ४८.८२ टक्के मतदान झाले आहे. उपनगरातील सर्वाधिक मतदान झालेल्या भागांमध्ये भांडुप आणि बोरिवली अग्रक्रमी आहेत. इतर भागांमध्ये दहिसर ४१.९४ टक्के, मागाठाणे ४०.२ टक्के,मुलुंड ३९.१ टक्के, विक्रोळी ४१.५ टक्के, भांडुप पश्चिम ४८.८२टक्के, जोगेश्वरी पूर्व ४५.५६ टक्के, दिंडोशी ४३.७८ टक्के, कांदिवली पूर्व ४१.८५ टक्के,चारकोप ३९.७ टक्के, मालाड पश्चिम ४१.१४ टक्के,गोरेगाव ४२.५९ टक्कर, वर्सोवा ३७.८४ टक्के, अंधेरी पश्चिम ४०.८६ टक्के,अंधेरी पूर्व ४२.६३ टक्के,विलेपार्ले ४३.८३ टक्के, चांदीवली ३१.८५ टक्के, घाटकोपर पश्चिम ४५.२३ टक्के,घाटकोपर पूर्व ४३.८५ टक्के, मानखुर्द शिवाजीनगर ३६.४२ टक्के,अणुशक्ती नगर ३८.६२ टक्के, चेंबूर ४०.७६ टक्के, कुर्ला ३८.८२ टक्के, कलिना ३९.०८ टक्के, वांद्रे पूर्व ३६.९३ टक्के, वांद्रे पश्चिम ३९.४९ टक्के इतके मतदान झाले आहे.
मतदान प्रक्रिया ६ वाजेपर्यंत चालणार असून,२३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे,मुंबई शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीमधील प्रत्यक्ष ताकद किती आहे, हे स्पष्ट होईल.