विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबरला खरंच सलग सुट्टी? शिक्षण आयुक्तांनी केलं स्पष्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबरला खरंच सलग सुट्टी? शिक्षण आयुक्तांनी केलं स्पष्ट

विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबरला खरंच सलग सुट्टी? शिक्षण आयुक्तांनी केलं स्पष्ट

Nov 15, 2024 10:45 PM IST

School Holiday Update : राज्यात २० नोव्हेंबरला सुट्टी असली तरी१८ आणि १९नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण
सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबर या सलग तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण आले असून शाळांना सरसकट सुट्टी नसल्यांची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. प्रत्येक शाळांमधील मुख्याध्यापकांनी  शाळांना सुट्टी देण्याचा विचार करावा, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

राज्यात २० नोव्हेंबरला सुट्टी असली तरी १८ आणि १९  नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. मात्र ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्याने शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी म्हटले आहे. 

शिक्षण आयुक्तालयाने सलग तीन दिवस शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. यावर शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात विधानसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना देण्याबाबत असे नमूद करण्यात आले. 

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील सर्व शाळांना पुढील आठवड्यात सोमवारी ते बुधवार अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय आवश्यकतेनुसार त्या-त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावा,  असा आदेश देणारे परिपत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी काढले होते. मात्र यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे अखेर शिक्षण आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण करणारे परिपत्रक शुक्रवारी काढावे लागले. 

शिक्षण विभागाने गुरुवारी परिपत्रक काढल्याने शाळांना सोमवारी (१८) आणि मंगळवारी (१९) सुट्टी जाहीर करण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतु ही कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मुख्याध्यापक स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर करू शकतात.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर