Mohol Constituency : शरद पवारांनी डाव टाकला; मोहोळमध्ये उतरवला विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mohol Constituency : शरद पवारांनी डाव टाकला; मोहोळमध्ये उतरवला विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार

Mohol Constituency : शरद पवारांनी डाव टाकला; मोहोळमध्ये उतरवला विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार

Updated Oct 28, 2024 03:45 PM IST

Mohol Constituency : मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा होती. पण शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम (siddhi Kadam)यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे.

मोहोळमधील उमेदवार सिद्दी कदम
मोहोळमधील उमेदवार सिद्दी कदम

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ९ उमेदवारांची तिसरी यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेच्या (Mohol Vidhansabah election) जागेवर शरद पवारांनी धक्कातंत्राचा वापर केला आहे. या मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा होती. पण शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम (siddhi Kadam) यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरल्या आहेत.

मोहोळ मतदारसंघात सिद्धी कदम यांचा सामना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटल्याप्रकरणी तुरुंगात होते. त्याचा ठपका पाहता शरद पवार गटाने सिद्धीला संधी दिल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना २५  हजार मतं मिळाली होती.  रमेश कदम जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा आगामी काळात जामीन रद्द झाला तर अडचण होऊ शकते, म्हणून सिद्धीचा पर्याय निवडण्यात आल्याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे. 

सर्वात कमी वयाच्या उमेदवार -

रिद्धी कदम या सध्या केवळ २६ वर्षांच्या आहेत. त्यांनी विजय मिळवल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रेकॉर्ड लिहिला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाल्या आहेत. २०१९ मध्ये रमेश कदम तुरुंगात असताना रिद्धी कदम यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्या निवडणुकीत त्यांना २५ हजार मते मिळाली होती. ते पाहता शरद पवारांनी रिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी यशवंत माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी यशवंत माने विरुद्ध शरद पवार गटाच्या उमेदवार सिद्धी कदम अशी लढत होणार आहे.

कोण आहे रिद्धी कदम ?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी रिद्धी कदम यांच्यासह  ११  महिलांना संधी दिली आहे. सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून सिद्धी कदम यांनी शिक्षण पूर्ण केले असून सध्या सिद्धी कदम या एका एनजीओमध्ये काम करतात. २०१९ च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. सिद्धी कदम या २६ वर्षांच्या तरूण उमेदवार आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या