constituency wise women mla winner list : महाराष्ट्रात महिलांनी सरकार आणलं असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वजण भूमिका मांडत असतात. मात्र महिलांना उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्ष हात आखडता घेताना दिसतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत यावेळी केवळ २१ महिला पोहोचल्या आहेत. त्यात १४ महिला या केवळ भाजपच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १० आमदारांमध्ये एकही महिला आमदार नाही. तर काँग्रेसची केवळ एकच महिला विधानसभेत पोहोचली आहे.
निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांनी महायुतीचं पारडं जड केलं.राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात असलेल्या २५० हून अधिक महिला उमेदवारांपैकी एकूण २१ महिला आमदार झाल्या आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींचा समावेश आहे.
भाजपने राज्यभरात १८ महिलांना संधी दिली होती, तर शिवसेना शिंदे गट ८ आणि अजित पवार गटाकडून ४ अशा पद्धतीने महायुतीकडून ३० महिला उमेदवार रिंगणात होत्या. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार (राष्ट्रवादी) ११, शिवसेना (उद्धव ठाकरे) १० व काँग्रेसने ९ अशा ३० महिलांना तिकीट दिली होती.विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ ३६३ महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती. यातील केवळ २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत.
श्वेता विद्याधर महाले - चिखली
श्रीजया अशोकराव चव्हाण- भोकर
बोर्डीकर मेघना दीपक साकोरे - जिंतूर
स्नेहा पंडित- वसई
सुलभा गणपत गायकवाड - कल्याण पूर्व
मंदा म्हात्रे - बेलापूर
मनिषा अशोक चौधरी - दहिसर
माधुरी सतीश मिसाळ - पर्वती
मोनिका राजीव राजळे - शेगाव
नमिता अक्षय मुंदडा - केज
अनुराधा अतुल चव्हाण - फुलंब्री
मंजुळा गावित - साक्री
संजना जाधव - कन्नड
सुलभा खोडे - (अमरावती),
सरोज अहिरे - (देवळाली),
सना मलिक - (अनुशक्तीनगर)
आदिती तटकरे - (श्रीवर्धन)
ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
प्रवीणा मोरजकर - कुर्ला
ज्योती गायकवाड - धवारी
मुंबईत विविध पक्षांकडून एकूण ३६ मतदारसंघांत ४९ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यापैकी केवळ चार महिला विजयी झाल्या आहेत. यात दहिसरमधून भाजपच्या मनिषा चौधरी,गोरेगावमधून विद्या ठाकूर,राष्ट्रवादीकडून सना मलिक व काँग्रेसकडून ज्योती गायकवाड यांचा समावेश आहे.