Maharashtra Election : महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान; वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election : महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान; वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?

Maharashtra Election : महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान; वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार?

Nov 21, 2024 09:43 AM IST

Voting Percentage in Maharashtra : रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत राज्यातील मतदानाचा आकडा ६५.१ टक्क्यांच्या पुढे गेला होता. यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विक्रमही मोडला गेला आहे.

महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान
महाराष्ट्रात ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान (Praful Gangurde /HT Photo)

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता निकालाची प्रतीक्षा आहे. यावेळी राज्यातील मतदारांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यात १९९५ नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदान झाले आहे. बुधवारी मतदानाचा टक्का ६५ टक्क्यांच्या पुढे गेला होता. आता महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन प्रमुख आघाडीचे पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत.

काल (२० नोव्हेंबर) रात्री ११.४५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ६५.१ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विक्रमही या मतदानात मोडला गेला आहे. यांच्याच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ६१.३९ टक्के मतदान झाले होते. तर, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते.

महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार

राज्यातील प्रचंड मतदानाचे कारण महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीला ४२.१ टक्के तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती. सत्ताधारी महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर, महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी सपा आहेत.

मोठी बातमी! नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी गाडी फोडली; परिसरात तणाव

देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जेव्हा जेव्हा मतदानात वाढ होते, तेव्हा भाजपला राजकीय फायदा होतो. मागील निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा फायदा भाजप आणि महायुती या दोन्ही पक्षांना होणार आहे.’

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार : नाना पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. विधानसभा निवडणूक उत्साहात पार पडली आणि महाराष्ट्राचे अभिमानी नागरिक राज्याच्या कल्याणाला प्राधान्य देणारे सरकार निवडून देतील, असे ते म्हणाले. जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, असेही त्यांनी म्हटले

विशेष म्हणजे राज्यातील मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९मध्ये राज्यातील मतदारांची संख्या ८.८५ कोटी होती, ती आता ९.६९ कोटी झाली आहे. अशा तऱ्हेने निवडणुकीच्या निकालात मतदारांची संख्याही मोठी भूमिका बजावते.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर