Maharashtra election: मुंब्रा- कळव्यातून जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी, नजीब मुल्ला यांचा १ लाख मतांनी पराभव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra election: मुंब्रा- कळव्यातून जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी, नजीब मुल्ला यांचा १ लाख मतांनी पराभव

Maharashtra election: मुंब्रा- कळव्यातून जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी, नजीब मुल्ला यांचा १ लाख मतांनी पराभव

Nov 23, 2024 05:13 PM IST

Karad South Constituency Result: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा- कळवा मतदारसंघातून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विजय मिळवला आहे.

मुंब्रा- कळव्यातून जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी
मुंब्रा- कळव्यातून जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी

Maharashtra Assembly election results 2024: महारााष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून (Mumbra-Kalwa Assembly Constituency) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सलग चौथ्यांदा बाजी मारली. त्यांची लढत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला (Najeeb Mullah) यांच्याशी होती. दरम्यान, २००८ मध्ये मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. तर, आव्हाड हे २००९ या मतदारसंघात आमदार म्हणून काम करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा हा भाग आहे.

या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. परंतु, जितेंद्र आव्हाड यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांचा जवळपास एक लाख मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जितेंद्र आव्हाड यांना १ लाख ५७ हजार १४१ मत मिळाली. तर, नजीब मुल्ला यांना ६० हजार ९१३ लोकांनी मतदान केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीत सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणाऱ्या मुंब्रा-कळव्यातील सर्व मतदारांचा मी आभारी आहे. मुंब्रा-कळव्याच्या चांगल्या भवितव्याच्या आमच्या दृष्टीकोनावरील तुमचा विश्वास मला दररोज प्रेरित करतो. मी सर्व सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा खूप आभारी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद...!’

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १०.२७ टक्के, काँग्रेसला १६.९२ टक्के आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १६.५२ टक्के मते मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी थोडी वाढली, पण त्याचा जागांवर काहीही परिणाम दिसून आला नाही. मात्र, त्यावेळी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट ८० टक्के होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकूण मतांची टक्केवारी ४८.७१ टक्के होती, तर यंदा ती ३२.८३ टक्क्यांवर आली आहे. तर भाजप आघाडीची एकूण मतांची टक्केवारी ४८.७३ टक्क्यांवर पोहोचली आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होती. लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता राज्यात कुणाची सत्ता स्थापन होणार? हे जवळपास निश्चितच झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, जनतेने महायुतीला निवडल्याचे दिसून येत आहे

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर