Maharashtra election results: मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव, अबू आझमी विजयी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra election results: मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव, अबू आझमी विजयी

Maharashtra election results: मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव, अबू आझमी विजयी

Nov 23, 2024 02:52 PM IST

Mankhurd Shivaji Nagar constituency Result: मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव झाला असून अणुशक्तीनगर विधानसभा निवडणुकीत त्यांची कन्या सना मलिक यांचा विजय झाला आहे.

मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव
मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव

Maharashtra Assembly election results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील अनेक उमेदवारांनी आघाडी घेतली असली तरी अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना पराभवाला सामोरे जावा लागले. नवाब मलिक हे समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते अबू आझमी यांच्याविरोधात मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढत होते. मात्र, त्यांच्या पदरात निशारा पडली आहे.

मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या नवाब मलिक यांचा ३९ हजार २५४ मतांनी पराभव झाला. नबाव मलिक हे चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यांना एकूण १५ हजार ४४२ मत मिळाली आहेत. तर, अबू आझमी यांना ५४ हजार ६९६ मत मिळाली आहे.

नवाब मलिक यांनी १९८४ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना फक्त २५०० मते मिळाली होती. यानंतर त्यांनी १९९६, १९९९ आणि २००४ मध्ये नेहरू नगरमधून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. दरम्यान, २००९ मध्ये ते मुंबईच्या अणुशक्ती नगरमधून विजयी झाले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम रामकृष्ण काते यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा नवाब मलिक हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

अबू आझमी यांच्याशी कथित मतभेद झाल्यानंतर नवाब यांनी समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नवाब मलिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अल्पसंख्याक मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंशी वाद

नवाब मलिक यांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी वाद सुरू आहे. भारतीय महसूल सेवेतील एका अधिकाऱ्याने ऑगस्ट २०२२ मध्ये उपनगरीय गोरेगाव पोलिसांकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मलिक यांचे समीर वानखेडेवर गंभीर आरोप

मलिक यांनी प्रसारमाध्यमांना आणि सोशल मीडियावर दिलेल्या मुलाखतींमध्ये जातीच्या आधारे वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू झाली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर